Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- लाल रंगाच्या चारचाकी गाडीत जबरदस्तीनं बसवलं अन् निर्जनस्थळी नेऊन अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

सांगली :- लाल रंगाच्या चारचाकी गाडीत जबरदस्तीनं बसवलं अन् निर्जनस्थळी नेऊन अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार
 

संशयित देशमुख याने गाडीतच मुलींवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर अश्‍लील चित्रण केले. ही घटना कोणाला सांगितल्यास घरच्यांना आणि बहिणीला मारण्याची धमकी दिली.

आटपाडी : अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने चारचाकी गाडीत उचलून नेत जबरदस्तीने बलात्कार केल्याचा प्रकार शहरात घडला आहे. या प्रकरणी संग्राम देशमुख आणि सुमित्रा लेंगरे या दोघांवर आटपाडी पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ही घटना गेल्या महिन्यात घडली. या घटनेतील पीडिता सतरा वर्षांची आहे. संग्राम देशमुख (आटपाडी) आणि त्याची साथीदार युवती सुमित्रा लेंगरे (लेंगरेवाडी) यांनी संगनमत करून पीडित मुलीला स्वतःच्या लाल रंगाच्या चारचाकी गाडीत जबरदस्तीने बसवून निर्जन ठिकाणी आटपाडी तलावावर  नेले. 

तेथे संशयित देशमुख याने गाडीतच मुलींवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर अश्‍लील चित्रण केले. ही घटना कोणाला सांगितल्यास घरच्यांना आणि बहिणीला मारण्याची धमकी दिली. तसेच दुसऱ्या दिवशी त्याचवेळी या ठिकाणी येण्याची धमकी दिली. संबंधित ठिकाणी न आल्यास फोटो इतरांना दाखवण्याची धमकी दिली. दुसऱ्या दिवशी पीडितेस पुन्हा ११ ऑगस्टला बोलावून दुपारी दोन वाजता नेऊन पुन्हा बलात्कार केला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला असून संशयितांनी वापरलेली गाडी पोलिसांनी जप्त केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.