Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

घृणास्पद कृत्य.! 85 वर्षीय वृद्धेला लिफ्टपर्यंत ओढत नेत तोंड दाबून केला बलात्कार; घटनेने खळबळ

घृणास्पद कृत्य.! 85 वर्षीय वृद्धेला लिफ्टपर्यंत ओढत नेत तोंड दाबून केला बलात्कार; घटनेने खळबळ
 

हिंजवडी : पिंपरी चिचवड येथील हिंजवडी परिसरातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. म्हाळुंगेतील एका उच्छभ्रू सोसायटीमध्ये आपल्या फ्लॅटसमोर चालत असणाऱ्या 85 वर्षीय वृद्धेला लिफ्टपर्यंत ओढत नेत तोंड दाबून एका 23 वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

23 सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास म्हाळुंगेतील एका उच्चभ्रू सोसायटीत हा घृणास्पद प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर हिंजवडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ओम जयचंद पुरी (वय-23, सध्या रा. साखरे वस्ती, मुळ रा. धाराशिव) असं अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव आहे. या प्रकरणी पिडीत वृद्धेच्या 57 वर्षीय मुलीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी पिडीत वृद्ध महिला सोसायटीतील पाचव्या मजल्यावरील आपल्या फ्लॅट समोर चालत होती. सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये तीन दिवसांपूर्वी इलेक्ट्रीशनचे काम करण्यासाठी आरोपी सोसायटीमध्ये आला होता. त्यानंतर पुन्हा सोमवारी तो पाचव्या मजल्यावर आला असता त्याने वृद्धेला पाहिले. त्यावेळी त्याने वृद्धेचे तोंड दाबून जिन्यातून फरफटत सहाव्या व सातव्या मजल्याच्या जिन्यातील मोकळ्या जागेत नेऊन बलात्कार केला. एवढंच नाही तर वृद्धेचा गळा दाबून हाताने मारहाण केली. हा सर्व प्रकार तब्बल पाऊण तास सुरू होता. या घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.

दरम्यान, वृद्धेने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगतिला. महिलेच्या मुलीने हिंजवडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन तातडीने तपासाची चक्रे फिरवत नराधमाला अटक केली आहे. मंगळवारी आरोपीला शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.