Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तिरुपतीनंतर मुंबईत खळबळ, सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादात उंदीर? व्हिडिओ व्हायरल

तिरुपतीनंतर मुंबईत खळबळ, सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादात उंदीर? व्हिडिओ व्हायरल
 

गेल्या काही दिवसांपासून देशात तिरुपती बालाजीच्या प्रसादातील भेसळीवर गदारोळ होत असताना आता मुंबईतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. संपुर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादात उंदीर अढळल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

अशात मंदिराच्या प्रशासनाने या आरोपांवर उत्तर देत, हे सर्व आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे. मंदिर प्रशासनाने हे सर्व आरोप नाकारले असले तरी, भाविकांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. साम टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार मुंबईतील प्रभादेवी परिसरात असलेल्या सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादात उंदीर आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे तिरुपती बालाजीच्या प्रसादातील कथित भेसळीनंतर सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादात उंदीर आढळ्याच्या दाव्यामुळे भाविकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये प्रसादाची पाकिटे भरुन ठेवलेल्या कॅरेटमध्ये एका कोपऱ्यात पास्टीक पिशवीवर काही उंदीर असल्याचे दिसत आहेत.

आमदार सदा सरवणकर यांचे स्पष्टीकरण

हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर माहीमचे शिवसेनेचे आमदार आणि सिद्धिविनायक मंदिर न्यासचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी आरोप नाकारले आहेत. या प्रकरणावर साम टीव्हीशी बोलताना सदा सरवणकर म्हणाले, "सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो आणि व्हिडिओ खोट आहेत. कारण आम्ही आतापर्यंत कायम स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. आमचा परिसर स्वच्छ असतो. जिथे प्रसाद करतो तिथे स्वच्छता असते. सर्व प्रसादाचे पॅकिंग हे मशिनीवर होते. त्यामुळे असा प्रकार घडणे शक्य नाही. याबाबत आम्ही चौकशी केली असून, यात काहीही तथ्य नाही."

देशभरातील मंदिरांच्या प्रसादावर भाविकांची शंका

आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादात चरबीयुक्त तूप वापरल्याच्या आरोपानंतर, याचा देशातील विविध मंदिरांच्या प्रसादावर परिणाम होऊ लागला आहे. अशाता आता मुंबईतील सिद्धविनायक मंदिरातील प्रसादामध्ये उंदीर आढळल्याचा दावा करण्यात येत आहे. यानंतर आता देशभरातील भाविक सर्वच मंदिरांमधील प्रसाच्या नुमुन्यांची तपासणी करण्याची मागणी करू लागले आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.