माशांचं असं सत्य समोर ऐकून मासे खाणंच सोडून द्याल; धक्कादायक रिसर्च समोर
मुंबई : मासे आवडीनं खाणाऱ्यांची संख्या खूपच मोठी आहे. कोणाला समुद्रातले मासे आवडतात, तर कोणाला नदी, धरण म्हणजेच गोड्या पाण्यातले मासे आवडतात. अनेक जण मत्स्यशेती करून उदरनिर्वाहदेखील करतात. नुकत्याच एका संशोधनातून असं दिसून आलं, की माशांनाही भावना असतात. माशांमध्ये भावना असतात का, त्यांना वेदना होतात का, त्यांच्यात स्वतःला ओळखण्याची क्षमता आहे का, असे प्रश्न अनेकांना पडतात.
आता सिडनी इथल्या मॅक्वेरी विद्यापीठाचे प्रोफेसर कुलूम ब्राउन यांनी केलेल्या संशोधनातून सिद्ध झालं आहे, की माशांमध्ये स्वतःला ओळखण्याची क्षमता असते. ते आरशात स्वतःला ओळखतात. त्यामुळे तुम्ही गाय, मांजर, कुत्रा किंवा एखाद्या पक्ष्याशी ज्या पद्धतीनं वागता, अगदी तसेच माशांशी वागू शकता, असं ब्राउन यांनी म्हटलं आहे.ओसाका विद्यापीठाच्या अभ्यासातदेखील मासे स्वतःला ओळखू शकत असल्याचं स्पष्ट झालं. विद्यापीठामध्ये माशांना भूल देऊन बेशुद्ध करण्यात आलं. त्यानंतर जेव्हा ते शुद्धीवर आले, तेव्हा त्यांनी आरशात स्वतःला पाहिले व स्वतःच्या मानेखाललचं चिन्ह ओळखण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी माशांनी स्वतःला दगडावर घासलं. 1970 मध्ये सुरू करण्यात आलेल्या मिरर सेल्फ रिकग्निशन टेस्टनुसार हे संशोधन करण्यात आलं. माशांबाबत ही टेस्ट यशस्वी झाली.
माशांना वेदना समजतात का?
वाइकातो विद्यापीठातले फिश इकोलॉजिस्ट प्रोफेसर निक लिंग यांनी याबाबत सांगितलं की, 'माशांना वेदनांची जाणीव होऊ शकते. रेनबो ट्राउटसारख्या माशांना मधमाशीचं विष इंजेक्शनद्वारे दिल्यास त्यांच्या श्वासोच्छ्वासाचा वेग वाढतो. ते स्वतःला खडकावर घासायला लागतात. शार्कमध्ये नोसिसेप्टर्स नसतात, त्यामुळे त्यांना वेदना होत नाहीत; पण याचा अर्थ असा होत नाही की, त्यांना वेदना होईल असं काम करावं. माशांच्या प्रजाती खूप वैविध्यपूर्ण आहेत.'
न्यूझीलंडमधल्या कँटरबरी विद्यापीठातले मानसशास्त्रज्ञ डॉ. मायकल फिलिप यांनी सांगितलं की, 'माशांबद्दल एखाद्या व्यक्तीचं वर्तन त्याच्या स्वत:च्या आकलनानुसार असतं. जेव्हा एखाद्या प्राण्याकडे अन्न म्हणून पाहिलं जातं, तेव्हा अनेकजण त्या प्राण्याच्या संवेदनशीलतेची काळजी घेत नसतात. जगभरातल्या अनेक देशांनी मासा हा संवेदनशील प्राणी असल्याचं मान्य करण्यास सुरुवात केली आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटरी यांनी माशांना संवेदनशील प्राणी म्हणून मान्यता दिली आहे.'
प्राण्यांना असते सहानुभूती
मिरर सेल्फ रेकग्निशन टेस्ट यापूर्वी अनेक सस्तन प्राणी, हत्ती आणि डॉल्फिन यांच्यावर यशस्वी झाली आहे. माशांमधल्या मिरर टेस्टचा निकाल वादग्रस्त होता. त्यामुळे यासंबंधीचा शोधनिबंध प्रकाशित होण्यासाठी पाच वर्षं लागली. मासे जगभरात सर्वाधिक खाल्ले जातात. दर वर्षी 1.1-2.2 ट्रिलियन टन मासे पकडले जातात. मासा हा पाळीव प्राणीदेखील आहे. परंतु अनेक जण माशांना पाळीव प्राणी मानत नाही. काही प्राण्यांमध्ये शिकण्याची, समजून घेण्याची आणि वेदना जाणवण्याची क्षमता असते, हे खील संशोधनातून समोर आलं आहे. माशांमध्ये भावना असल्याचं संशोधनातून समोर आल्यानं आता त्यांना खाण्यापूर्वी संवेदनशील व्यक्ती विचार करतील, हे मात्र नक्की.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.