बाथरूममध्ये गेली बायको, परत आली तेव्हा हातात बाळ; कसं झालं? महिलेसह नवरा धक्क्यात
नवी दिल्ली : एखाद्या महिलेची प्रसूती विमानात किंवा ट्रेनमध्ये झाल्याचं तुम्ही ऐकलं असेल. पण एका महिलेनं तिच्या घरातील बाथरूममध्ये बाळाला जन्म दिलाय. विशेष म्हणजे घरात असणाऱ्या तिच्या पतीला याची पुसटशी कल्पनाही आली नाही.
संबंधित महिला बाथरूममध्ये असतानाच तिला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच तिने बाळाला जन्म दिला. सुदैवानं बाळ आणि आई दोघंही सुखरूप आहेत. पण या घटनेचा महिलेला मानसिक धक्का बसलाय.अमेरिकेतील अलास्का येथील ही घटना आहे. मिररच्या वृत्तानुसार, टीगन स्वोबोडा (वय 36) या गर्भवती होत्या. 11 ऑगस्ट 2024 ला सकाळी त्या बाथरूममध्ये गेल्या. तिथेच त्यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यावेळी बाथरूममध्ये प्रसूती होईल, अशी कल्पनाही त्यांना नव्हती. त्यामुळे त्यांनी पती टोनी यांच्याकडे मदत मागितली नव्हती. जेव्हा टीगन यांनी टोनी यांना सांगितलं की, 'कदाचित आज प्रसूती होऊ शकते.' तेव्हा टोनी घरातील स्विमिंग पूल व्यवस्थित करण्यास गेले. कारण पाण्यात प्रसूती व्यवस्थित होईल, असं त्यांना वाटत होतं. पण त्यापूर्वीच टीगन यांनी बाथरूममध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला.
पाच मिनिटांत बाळाचा जन्म
टीगन यांनी सांगितलं की, 'माझे पती टोनी पूल तयार करीत होते. त्याचवेळी मला बाथरूममध्ये प्रसूती वेदना होऊ लागल्या, पाच मिनिटांत मी एका मुलीला जन्म दिला. मला होणाऱ्या वेदना एवढ्या तीव्र होत्या की, मी माझ्या समोर असणाऱ्या बाथटबपर्यंत पोहोचू शकले नाही. मला चालतानाही त्रास होत होता. मी माझ्या मुलीला जन्म देताना एकटीच होते, हे माझ्यासाठी खूप भीतीदायक होतं. मी कधी तिचं डोकं तर कधी हात धरायचा प्रयत्न करीत होते. पण माझा हात घसरत होता. हे पाहून मला खूप भीती वाटली. मग मी एका हातानं तिचं डोकं धरलं, व दुसरा हातानं तिची पाठ धरली. त्यानंतर तिला कसंतरी बाहेर काढलं. तिचा जन्म झाला तेव्हा तिला स्वतः घ्या अंगावर झोपवलं व तिच्या पाठीवरून हात फिरवला. तेव्हा ती रडायला लागली. मी तिच्याकडे काही क्षण फक्त पाहत होते,' असंही टीगन म्हणाल्या.
आज देखील तो क्षण आठवला तर...
टीगन या बाथरूममध्ये असताना तेथे काही मिनिटांनंतर टोनी पूल तयार असल्याचं सांगण्यासाठी आले होते. पण बाथरूममध्ये गेल्यानंतर तेथील दृश पाहून ते आश्चर्यचकीत झाले. टीगन या स्वतः नर्स आहेत. बाथरूममधील प्रसुतीचा क्षण आठवताना त्या म्हणाल्या, 'मला जे काही घडलं ते समजण्यासाठी वेळ मिळाला नाही. मी शॉकमध्ये होते. आजही तो क्षण आठवला की धक्का बसतो. कारण मला अजूनही समजत नाही की, मी हे सर्व कसं करू शकले. पण टोनी बाथरूममध्ये आल्यानंतर मी त्याला म्हणाले, 'काळजी करू नको, सर्व काही ठीक आहे. बघ माझ्याकडे तुझ्यासाठी एक गिफ्ट आहे. माझी मुलगी बेबी इलियट.' इलियट ही तिच्या चार मोठ्या भावांप्रमाणेच खूप गोड आहे,' असंही टीगन यांनी सांगितलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.