Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक! एकत्र खेळत असताना मोबाईलवर अश्लील क्लिप पाहत दोन अल्पवयीन मुलांनी केला पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; आरोपी ताब्यात

धक्कादायक! एकत्र खेळत असताना मोबाईलवर अश्लील क्लिप पाहत दोन अल्पवयीन मुलांनी केला पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; आरोपी ताब्यात
 

शिरवळ : खंडाळा तालुक्यातुन एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शिरवळ पोलिस ठाणे हद्दीतील एका गावात पाच वर्षीय बालिकेवर मोबाईल मधील अश्लील व्हिडिओ पाहून दोन अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले असून शिरवळ पोलिस याबाबत चौकशी करत आहे. तसेच पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील शिरवळ पोलिस ठाणे हद्दीत एका गावात ही धक्कादायक घटना घडल्याचे उघड झाले आहे. ही घटना सोमवारी (दि.१६)रोजी उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती समजताच शिरवळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. मात्र यावेळी आरोपींनी पलायन केले होते. पोलिसांनी वेगाने सूत्र फिरवून संबंधित दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

टेरेसवर नेत अत्याचार..
याबाबत अधिक माहिती अशी की, दोन्ही कुटुंब बाहेर गावचे असून शिरवळ परिसरातील एका गावात भाडोत्री म्हणून राहत आहेत. पीडित बालिका आणि आरोपी हे शेजारी राहत आहेत. चार वर्षीय मुलगी संबंधित मुलांकडे खेळायला जात असे. रविवारी ( दि.१५) रोजी पिडीत व आरोपी हे एकत्र खेळत असताना पीडितेला आरोपीने घराच्या टेरेसवर नेत मोबाईल मधील अशील क्लिप पहात अत्याचार केला.

या नंतर प्रकार पीडितेने आपल्या आईला सांगितला. या घटनेबाबत शिरवळ पोलिसांना माहिती मिळाली आणि त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पीडित मुलीच्या आईने शिरवळ पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दाखल केली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी भेट दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक नयना कामठे करीत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.