Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंब्रा बायपासवर पोलिसांची गाडी आली, अन् घडला थरार; जाणून घ्या अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरची A टू Z स्टोरी

मुंब्रा बायपासवर पोलिसांची गाडी आली, अन् घडला थरार; जाणून घ्या अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरची A टू Z स्टोरी
 

ठाणे :- राज्यात बदलापूरच्या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे, असं असतानाच आता बदलापूरातील शाळेत लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेची आत्महत्या नाही तर एन्काऊंटर झाल्याची माहिती मिळत आहे.

पोलीसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे. या गोळीबारात अक्षय गंभीर जखमी असून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, एका पोलिस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार अक्षय शिंदेने स्वत:वर गोळी झाडली नसून अक्षयचा एन्काऊंटर झाला आहे. अक्षय शिंदेला तळोजा जेलमधून ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळी झाडली. त्याने दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर पोलीसांनी स्वसंरक्षणासाठी बंदूक चालवली आहे.

स्वसंरक्षणासाठी गोळी झाडली

तळोजा जेलमधील सूत्रांच्या माहितीनुसार अक्षय शिंदेला तळोजा जेलमधून बदलापूर क्राईम ब्रान्चला घेऊन जात होते, त्यावेळी हा प्रकार घडला. या झटापटीत एपीआय निलेश मोरे यांना लागली गोळी लागली आहे. साधारण 6.30 च्या आसपास पोलीसांची टीम मुंब्रा बायपास जवळ आली. तेव्हा आरोपीने एका कॉन्स्टेबलच्या हातातून बंदूक हिसकावून गोळीबार केला. पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर झालेल्या झटापटीत एपीआय निलेश मोरे यांनी स्वसंरक्षणासाठी गोळी झाडली. यामध्ये अक्षय गंभीर जखमी झाला. अक्षयच्या चेहऱ्यावर गोळ्या लागल्याची माहिती समोर आली आहे.

अक्षय शिंदेवर तीन गोळ्या झाडल्या

पोलिसांनीही स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेवर तीन गोळ्या झाडल्या. पोलिसांच्या गोळीबारामुळं जखमी झालेल्या अक्षयला कळवा रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी अक्षय शिंदेला मृत घोषित केलं.जखमी झालेल्या एपीआय निलेश मोरेंवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोण आहे अक्षय शिंदे?
अक्षय शिंदेचे वय 24 वर्षे
अक्षयचे शिक्षण दहवीपर्यंत
अक्षय शिंदे बदलापूर येथील एका शाळेचा शिपाई
या आधी अक्षय एका इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता
एका कंत्राटामार्फत आदर्श शाळेत शिपाई म्हणून लागला
अक्षय,आई-वडील आणि त्याचा भाऊ आणि भावाची बायको असे त्याचे कुटुंब
अक्षयची तीन लग्न झाली होती मात्र तिनही बायका सोडून गेल्या होत्या
अक्षय कर्नाटकातील गुलबर्गा या गावातील
मात्र अक्षयचा जन्म बदलापूरमधील खरवई गावात

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.