बाबा सिद्दीकी यांच्या मारेकऱ्यांचे छायाचित्र आले समोर, दोघांना अटक; तिसरा फरार
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री मुंबईतील वांद्रे परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून तिसरा आरोपी फरार झाला आहे.
तीनही आरोपींचे छायाचित्र समोर आले आहे.
अटक केलेल्यांपैकी एक आरोपी उत्तर प्रदेशचा तर दुसरा हरयाणातील आहे. फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. सिद्दीकी यांची हत्या नेमक्या कोणत्या कारणातून झाली हे अद्याप कळू शकले नाही. बाबा सिद्दीकी हे यावर्षीच काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी अजित पवार गटात सामील झाले होते.
सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर आरोपी आधीच दबा धरून बसले होते. संधी मिळताच त्यांनी सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला. यात सिद्दीकी यांच्या छातीत आणि पोटाला गोळी लागली. जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.