बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या; शरद पवारांनी केली देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी
दरम्यान, या घटनेनंतर आता शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. "राज्याची कोलमडलेली कायदा
सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी
राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे.
गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे. बाबा सिद्दिकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो." अशी पोस्ट आपल्या X अकाउंटवरून शरद पवार यांनी केली आहे पाहा पोस्ट -
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.