Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चौथीतील मुलीवर वकिलाकडून अत्याचार, गंगाखेडमधील प्रकार, पीडितेच्या आजीविरुद्धही गुन्हा दाखल

चौथीतील मुलीवर वकिलाकडून अत्याचार, गंगाखेडमधील प्रकार, पीडितेच्या आजीविरुद्धही गुन्हा दाखल


गंगाखेड : चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या दहावर्षीय मुलीवर शहरातील ॲड. राम गायकवाड याने वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पुणे येथील भोसरी पोलिस ठाण्यात वकिलासह पीडितेच्या आजीविरुद्ध गुन्हा दाखल झाला.


हा गुन्हा गंगाखेड पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. मुलीचे आई-वडील पुण्यात असतात. त्यांची आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळे मुलीला शिक्षणासाठी आजीकडे ठेवले होते. आजीकडे येणाऱ्या ॲड. राम गायकवाड याने ऑगस्ट २०२३ पासून २४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत तिच्यावर वारंवार अत्याचार करून शारीरिक संबंध ठेवले. पीडितेच्या आजीच्या संगनमताने हा प्रकार सुरू होता.

 

घडलेला प्रकार कोणास सांगितल्यास घराच्या पाठीमागे शेतात पुरून टाकण्याची धमकी तिला संशयिताने दिली होती. दिवाळीच्या सुटीत पुण्याला गेल्यावर संबंधित मुलीने हा प्रकार आईला सांगितला. तिच्या आईने सोमवारी पुण्यातील भोसरी पोलिस ठाण्यात संशयित राम गायकवाड व त्यास साहाय्य करणाऱ्या पन्नासवर्षीय आजीविरुद्ध अत्याचारासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमाच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा गंगाखेड पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला.

दोघांना घेतले ताब्यात

उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, पोलिस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या पथकातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राम गायकवाड याच्यासह पीडितेच्या आजीला ताब्यात घेतले आहे. सहायक पोलिस निरीक्षक राम गित्ते तपास करीत आहेत.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.