Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक! मूल होत नसल्याने विवाहितेवर पती, दिरासह मांत्रिकाने केला सामूहिक बलात्कार

धक्कादायक! मूल होत नसल्याने विवाहितेवर पती, दिरासह मांत्रिकाने केला सामूहिक बलात्कार
 

सांगली : मूल होत नसल्याच्या अंधश्रद्धेला बळी पडून विवाहितेचा सासरच्या लोकांनी शारीरिक व मानसिक छळ केला.

धक्कादायक बाब म्हणजे त्या विवाहितेवर शुद्धीकरणाच्या नावाखाली पती, दीर आणि अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील मांत्रिकाने सामूहिक बलात्कार  केला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, याची विश्रामबाग पोलिसांनी  गांभीर्याने दखल घेतली आहे. 

दरम्यान, पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी पती, दीर आणि बुवा काशिनाथ रामा उगारे (वय ४०, अर्जुनवाड, ता. शिरोळ) याला अटक केली आहे. संशयितांवर जादूटोणा प्रतिबंधक कायदा  आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.


पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पंढरपूर तालुक्यातील तरुणीचा सांगलीतील विश्रामबाग परिसरातील सुशिक्षित कुटुंबातील तरुणाशी विवाह झाला आहे. मूल होत नसल्यामुळे तिचा छळ होऊ लागला. कुटुंब अंधश्रद्धेच्या आहारी गेले होते. त्यामुळे घरात सतत बुवा, महाराज यांना आणले जात होते. बुवाचे पाय धुवून पाणी प्यायला लावले जात होते. मूल होत नाही म्हणून तरुणीचा छळ करत होते. विश्रामबाग येथील घरी तसेच अर्जुनवाडमधील मंदिरात तिचा छळ सुरू होता.


काही महिन्यांपूर्वी पीडित तरुणीची सासरची मंडळी चारचाकीतून निघाली होती. तेव्हा वाटेत गाडी बंद पडली. त्यांनी अर्जुनवाड येथील बुवा काशिनाथ उगारे याला मोबाईलवरून कॉल केला. त्याला हकीकत सांगितली. तेव्हा त्याने पीडितेच्या कुटुंबीयांना तुमची सून अपशकुनी आहे. तिचे शुद्धीकरण करावे लागेल, असे सांगितले. दुसऱ्याच दिवशी धार्मिक विधी करण्याचे ठरले.

दुसऱ्या दिवशी विश्रामबाग येथे बुवा उगारे पीडित तरुणीच्या घरी आला. पूजापाठ झाल्यानंतर तरुणीस अंघोळ करण्यास सांगितले. त्यानंतर शुद्धीकरणाच्या नावाखाली पती, दीर आणि बुवा काशिनाथ यांनी पीडितेवर बलात्कार केला. या प्रकारानंतर पीडिता माहेरी गेली होती. काही दिवस ती रडतच होती. अखेर तिच्या आईने वारंवार विचारणा केल्यानंतर तिने घडलेली हकीकत सांगितली. त्यामुळे माहेरच्या मंडळींना धक्का बसला. त्यानंतर पीडितेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार पती, दीर, सासू, सासरे आणि बुवाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पती, दीर, बुवा काशिनाथला अटक केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.