Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बापरे...सोफ्याच्या आत सापांचा घोळका; VIDEO पाहून अंगाचा उडेल थरकाप

बापरे...सोफ्याच्या आत सापांचा घोळका; VIDEO पाहून अंगाचा उडेल थरकाप
 

सोशल मीडियावर सध्या छत्तीसगड राज्यातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात तेथील एका घरात असलेल्या सोफ्यामधून चक्क एक नाही तर अनेक साप आढळून आलेले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालेला आहे.


व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एका घरा बाहेरील परिसर दिसत आहे. जिथे एक व्यक्ती एक सळी घेऊन सोफा फाडत आहे. शिवाय तिथे अनेक व्यक्ती सोफ्यामध्ये नक्की साप कुठे लपला असेल ते पाहत आहे. काही वेळात तो व्यक्ती सोफा पूर्णपणे फाडतो आणि त्यात चक्क तुम्ही पाहिले तर साप दिसून येतात. या घटनेला पाहून त्या परिसरातील अनेक व्यक्ती घाबरलेले दिसत आहेत.

 

व्हायरल व्हिडिओ छत्तीसगडमधील अंबिकापुर येथील आहे. मात्र तो सध्या 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून एक्स प्लॅटफॉर्मवरील ''@inhnewsindia'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''अंबिकापुरात सोफ्यावर सापाचा डेरा, सोफ्यात साप आढळल्याने कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण होते'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ कधीचा आहे हे कळू शकलेले नाही मात्र सध्या मोठ्या प्रमाणात घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

 

एक्सवर व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''बापरे'' तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,''काय काय पाहाव लागेल'' तर तिसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''बरोबर आहे तुम्ही बेडवर झोपू शकता तर ते सोफ्यावर पण झोपू शकत नाही का'', अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.