Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आठ वर्षाच्या लहान मुलासोबत ४० वर्षीय व्यक्तीचे अश्लिल चाळे; पोलिसांनी केली अटक

आठ वर्षाच्या लहान मुलासोबत ४० वर्षीय व्यक्तीचे अश्लिल चाळे; पोलिसांनी केली अटक
 

एका आठ वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी एका ४० वर्षीय व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. ही घटना बिजलीनगर, चिंचवड येथे मंगळवारी (दि. २८) सकाळी घडली होती. मुलाने दिलेल्या माहितीनुसार आरोपीला अटक करण्यात आली आहे. नागनाथ श्रीहरि कासले (वय ४०, रा. ड्रायव्हर कॉलनी, काळेवाडी फाटा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत ४२ वर्षीय व्यक्तीने बुधवारी (दि. २९) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ वर्षाचा पिडीत मुलगा बुधवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास त्यांच्या मित्राच्या घरी खेळण्यासाठी गेला होता. त्यावेळी लाल रंगाचा चेक्सचा शर्ट घातलेल्या एकाने लहान मुलाशी अश्लिल चाळे केले. घरी आल्यावर त्या मुलाने घडलेली हकीगत आपल्या आईला सांगितली.

 

सायंकाळी त्या पिडित मुलाचे वडिल घरी आल्यावर मुलाच्या आईने घडलेली हकीगत मुलाच्या वडिलांना सांगितली. पिडित मुलासोबत असलेल्या दोन मुलांकडे चौकशी केली असता त्यांनी तो लाल रंगाचा चेक्सचा शर्ट घातलेला माणूस जवळच्या बांधकामावर काम करीत असल्याचे सांगितले. पिडीत मुलाचे वडिल व शेजारी यांनी त्या बांधकामच्या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता तो मिळून आला नाही. मात्र बांधकाम मालकाने काही फोटो दाखविले असता त्या लहान मुलांनी आरोपी नागनाथ कासले याला ओळखले. त्यानुसार पोलिसात तक्रार दाखल झाल्यावर आरोपीला चिंचवड पोलिसांनी अटक केली. दरम्यान आरोपीने याच परिसरातील आणखी एका मुलासोबत असेच कृत्य केले असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र त्या मुलाच्या पालकांनी याबाबत तक्रार देण्यास नकार दिला आहे.

त्या घटनेतील आरोपी अद्याप मोकाट

भंगार आणयला चला तुम्हाला खाऊ देतो, असे सांगून एका आठ वर्षीय मुलाला केएसबी चौक येथे नेऊन त्याच्यावर अत्याचार करण्यात आला. नागसेननगर-बिजलीनगर भागात १५ वर्षांपूर्वी घडलेल्या या गुन्ह्यातील आरोपीचा अद्यापही शोध लागलेला नाही. बुधवारी लहान मुलावर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे पुन्हा एकदा त्या घटनांची आठवण चिंचवडकरांना झाली.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.