राष्ट्रीय स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये सांगलीच्या आर्यन बारिताया याचे यश
सांगली / खोपोली (मुंबई) येथे दि. ८ ते १० फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या इंड्यूरंस राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये सांगली, मिरज, कुपवाड रोलर स्केटिंग असोसिएशन व सई स्केटिंग अकॅडमीच्या पाच खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत भारतातील विविध राज्यातील १८०० निवडक खेळाडूंची उपस्थिती होती.
स्पर्धेत विविध वयोगटात सांगलीच्या आर्यन बारिताया याने सात वर्षाखालील वयोगटात कांस्य तसेच जैनिक शहा याने दहा वर्षाखालील वयोगटात कांस्य पदक मिळवून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. तसेच श्रीनिकेत लड्डा, मनस्वी काशीद, शिवांक कुंभार या खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली. विजेत्या खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे. या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सूरज शिंदे, परविन शिंदे, आयेशा मुलाणी यांचे मार्गदर्शन लाभले. माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, पृथ्वीराज पवार, उपाध्यक्ष प्रदीप घडशी व पालकांचे प्रोत्साहन लाभले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.