Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उदगावमध्ये पूर्ववैमनस्यातून तरूणाचा सपासप वार करत खूनमध्यरात्रीची घटना, दोघेजण ताब्यात, मृत रेकॉर्डवरील गुन्हेगार

उदगावमध्ये पूर्ववैमनस्यातून तरूणाचा सपासप वार करत खून मध्यरात्रीची घटना, दोघेजण ताब्यात, मृत रेकॉर्डवरील गुन्हेगार
 

जयसिंगपूर :  शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे एका तरूणाचा धारदार शस्त्राने छाती, पोट, पाठीवर सपासप १३ वार करत खून करण्यात आला. रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी तातडीने हालचाली करत दोन संशयितांना ताब्यात घेतल्याचे जयसिंगपूरचे पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांनी सांगितले. दरम्यान या घटनेमुळे उदगावसह जयसिंगपूरमध्ये खळबळ उडाली आहे. 

विपूल प्रमोद चौगुले, (वय २०, रा. जैन बस्तीजवळ, उदगाव) असे मृत तरूणाचे नाव आहे. तर पोलिसांनी संशयावरून अनिकेत मोरे, नागेश जाधव यांना ताब्यात घेतले आहे. गेल्यावर्षी झालेल्या मोहरमच्या निवडणुकीत मृत विपूल आणि संशयित तरूणांच्यात एकमेकांकडे रागाने पाहण्यावरून वाद झाला होता. त्याचा राग संशयितांच्या मनात होता. शनिवारी रात्री त्यांच्या जुन्या कारणावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला. 

सांगली रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाजवळ त्यांचा वाद सुरू होता. त्यावेळी संशयितांनी चाकूने बेदरकारपणे विपूलच्या छाती, पोट, पाठीवर सपासप १३ वार केले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर संशयित तेथून निघून गेले. याची माहिती मिळताच निरीक्षक हाके तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी गंभीर जखमी विपूलला सांगलीच्या शासकीय रूग्णालयात हलवण्यात आले. त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यातील मृत विपूल चौगुले पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर आर्म ऍक्टचा गुन्हा दाखल आहे. याबाबत जयसिंगपूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.