Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सावधान! कोणत्याही लिंकशिवाय Whatsapp होतंय हॅक, काय आहे झीरो क्लिक हॅक?

सावधान! कोणत्याही लिंकशिवाय Whatsapp होतंय हॅक, काय आहे झीरो क्लिक हॅक?
 

तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप युजर असाल तर तुम्हाला सावध व्हायला हवं. आतापर्यंत तुम्ही ऐकलं-वाचलं असेल की एखाद्या लिंकवर क्लिक केल्याने मोबाईल फोन हॅक झाला. पण आता अत्याधुनिक तंत्रज्ञानातील स्पायवेअर सॉफ्टवेअर्स तुम्ही कुठलीही लिंक क्लिक केली नसली तरीही थेट तुमचा फोन हॅक करू शकतात.

याच हॅकिंगला 'झीरो क्लिक हॅक' म्हणतात. जगभरातील 24 हून अधिक देशांतील 90 सरकारी सुरक्षा अधिकाऱ्यांचे फोन अशाप्रकारे हॅक करण्याचा प्रयत्न झाला आहे. फक्त महत्त्वाचं म्हणजे ज्यांचे फोन हॅक झाले आहेत ते पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आहेत. सामान्य माणसाला तसा धोका नाही असं वाटलं तरीही क्लिक न करता फोन हॅक होत असेल तर आपणही सावध व्हायला हवं.

इटलीसह युरोपातील अनेक देशांतील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या फोनला हॅक करणारं हे सॉफ्टवेअर इस्रायली सर्व्हिलन्स कंपनी पॅरॅगॉन सोल्युशन्सशीसंबंधित असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यात झीरो क्लिक हॅक पद्धतीत त्या व्यक्तीने कोणत्याही लिंकवर क्लिक न करता थेट त्याचा फोन हॅक होतो. सामान्यपणे पॅरॅगॉन स्पायवेअर अपराधाविरुद्ध लढणारे अधिकारी आणि कोणत्याही देशाची राष्ट्रीय सुरक्षा या विषयात काम करणाऱ्या सरकारी व्यक्ती वापरतात. व्हॉट्सअ‍ॅपच्या अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितलं की, या स्पायवेअरच्या हल्ल्याला बळी पडलेल्या अधिकाऱ्यांच्या मोबाईल्सने तडजोड केली असावी. इस्रायली स्पायवेअर कंपनी पॅरॅगॉन सोल्युशन्स 90 पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते संरक्षण अधिकारी यांचे फोन हॅक केले आहेत.
झीरो क्लिक हॅक काय असतं?

या मोबाईल वापरणाऱ्याने कोणत्याही मॅलिशियस लिंकवर क्लिक केलेलं नसलं तरीही त्याचा फोन थेट हॅक होतो. त्या मोबाईलशी कुठल्याही सॉफ्टवेअरही एकदाही इंटरअ‍ॅक्शन झाली नसली तरीही मोबाईलमध्ये शिरण्याची परवानगी मोबाईलकडून दिली जाते. यातून वाढत्या सायबर हल्ल्यांतील जोखमीचं गांभीर्य अधोरेखित होत आहे.
रॉयटर्सच्या रिपोर्टसनुसार, व्हॉट्सअ‍ॅप अधिकाऱ्यांनी विशेषत: कुठल्या व्यक्तींना हल्ल्यात लक्ष्य केलं गेलं आहे हे सांगायला नकार दिला. पण त्यांनी सांगितलं की हा सायबर हल्ला झालेले लोक युरोपातील देशांसह 24 देशांमधले अधिकारी आहेत. द गार्डियनने सांगितलं की पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर हे हल्ले होत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅपने हॅकिंगचा प्रयत्न करणाऱ्यांना लगाम घातला असून, कॅनडातील इंटरनेट वॉचडॉग ग्रुप सिटिझन लॅबला टारगेट केलं आहे. पॅरॅगॉन हॅकसाठी जबाबदार असल्याचं कसं निश्चित केलं असं विचारलं असता व्हॉट्सअ‍ॅप अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास नकार दिला. त्यांनी सांगितलं की, कायद्याशी संबंधित आणि इंडस्ट्री पार्टनर्सना याबाबत माहिती दिली होती पण,अधिक माहिती दिली नाही.
सिटिझन लॅबचे संशोधक जॉन स्कॉट-रेलटन म्हणाले, 'व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना टारगेट करणाऱ्या पॅरॅगॉन स्पायवेअरचा सापडल्याने हे अधोरेखित होतंय की स्पायवेअरचा प्रसार सुरूच आहे. आणि जसजसा तो वाढतोय तसतसं आम्ही हॅक झालेल्या फोनच्या पॅटर्नचा अभ्यास करत आहोत.' ते म्हणाले,'स्पायवेअर मर्चंट पॅरॅगॉन सरकारी क्लायंट्सना हाय-एंड सर्व्हिलन्स सॉफ्टवेअर्स विकतात आणि सामान्यपणे आपल्या सर्व्हिसेसना अपराधविरुद्ध लढण्यासाठी तसंच राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाच्या आहेत असं सांगतात. पण पत्रकार, कार्यकर्ते, विरोधी पक्षनेत्यांच्या आणि कमीतकमी 50 अमेरिकी अधिकाऱ्यांच्या फोनमध्ये अशी हेरगिरी करणारी उपकरणं अनेकदा आढळली आहेत, त्यामुळे हे तंत्रज्ञान अनियंत्रितपणे पसरू शकतं अशी भीती व्यक्त होत आहे.'

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.