Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुलीचा आनंद पाहवेना; आंतरधर्मीय लग्न केल्याच्या रागातून कुटुंबांचं घृणास्पद कृत्य

मुलीचा आनंद पाहवेना; आंतरधर्मीय लग्न केल्याच्या रागातून कुटुंबांचं घृणास्पद कृत्य
 

आजही आपल्या देशातील धर्म-जातीतील तेढ संपलेली नाही. ही तेढ इतकी टोकापर्यंत जाते की अनेकदा एकमेकांचा जीव घ्यायला लोक मागे-पुढे पाहत नाही. अशातच जालन्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंतरजातील विवाह केल्यानंतर मुलगी पहिल्यांदा माहेरी आली. यानंतर मुलीला जाड लोखंडाच्या साखळीने बांधून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे तरुणीच्या पतीने छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात पत्नीला सोडविण्यासाठी धाव घेतली. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. न्यायालयाचा आदेश मिळाल्यानंतर पोलिसांनी तरुणीची सुटका केली.


 

 

 

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, शहनाज उर्फ सोनल हिने छत्रपती संभाजीनगर येथील मिसाळवाडी येथे राहत असताना तेथील सागर ढगे या मुलासोबत आंतरधर्मीय विवाह केला होता. यामुळे रागावलेल्या मुलीच्या कुटुंबाने तो परिसर सोडण्याचं ठरवलं आणि मुलीचं कुटुंबीय भोकरदनजवळ असलेल्या आलापूर येथे आपल्या मूळ गावी राहण्यासाठी गेले होते. लग्नानंतर शहनाज उर्फ सोनलला तीन वर्षांचा मुलगाही झाला. दरम्यान दोन महिन्यांपूर्वी सोनलच्या मोठ्या बहिणीची प्रसृती झाली. त्यामुळे बाळाला पाहण्यासाठी सोनलच्या आईने तिला बोलावून घेतलं. शहनाज तिचा पती सागर व मुलगा कार्तीक यास घेउन आलापुर येथे गेली असता तिच्या आई वडीलांनी शहनाज व तिचा मुलगा कार्तिक यास घरात डांबुन ठेवत पती सागर याला घरातून हाकलून दिले. काही दिवसांनी सागर पुन्हा सोनलला घेण्यासाठी आलापूर येथे गेला. मात्र तुझा धर्म वेगळा असल्याचं सांगून आम्ही शहनाजचं आपल्या धर्मात लग्न लावून देणार असल्याचं सांगितलं. याशिवाय सागरला शिवीगाळ करून घरातून हाकलून दिलं. यानंतर सोनलच्या बहिणीने सागरला फोन करून धक्कादायक माहिती दिली.

 

सोनलला आणि तिचा मुलगा कार्तिकला घरात डांबून ठेवलं असून तिला लोखंडी साखळीने बांधून ठेवल्याचंही सांगितलं. यानंतर सागरने छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात धाव घेत न्यायालयाकडे पत्नीची व मुलाची सुटका करण्याची विनंती केली. त्यामुळे उच्च न्यायालयाने भोकरदन पोलिसांना सोनल आणि तिच्या मुलाची सुटका करण्याचे आदेश दिले.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.