Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नवरदेवाचा सिबिल स्कोर कमी म्हणून मोडले लग्न

नवरदेवाचा सिबिल स्कोर कमी म्हणून मोडले लग्न
 


सिबिल स्कोर खराब असेल तर बँका किंवा पतसंस्था ग्राहकाला कर्ज देत नाहीत. मात्र कमी सिबिलमुळे लग्न मोडल्याची घटना अकोला येथील मूर्तीजापूर येथे घडली. लग्नाची तारीख व अन्य बाबींवर चर्चा करण्यासाठी नवरदेव आणि वधूचे कुंटुंबीय जमले होते. त्या वेळी वधूच्या काकाने नवरदेवाची सिबिल स्कोर तपासण्याची मागणी केली. त्याप्रमाणे पॅनकार्डवरून नवरदेवाचा सिबिल स्कोर तपासण्यात आला. तो खूप कमी असल्याचे आढळून आले. मुलाच्या नावावर बरेच कर्ज असल्याचे समजले.

 
त्याने कर्जाची परतफेड केलेली नव्हती, तो थकबाकीदार होता. त्यानंतर मुलीच्या घरच्या मंडळींनी लग्न मोडण्याचे ठरवले. वधूचे काका म्हणाले, नवरदेव आधीच आर्थिक समस्यांनी वेढलेला आहे. तो आपल्या पत्नीला आर्थिक सुरक्षा देऊ शकत नाही. हा मुद्दा मुलीच्या घरच्या अन्य सदस्यांना पटला आणि त्यांनी लग्नास नकार दिला.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.