2017 मध्ये आयपीएस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांनी 2016 मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. 2017 मध्ये त्या आयपीएस अधिकारी बनल्या. एनआयटी भोपाळमधून बी.टेक पूर्ण केल्यानंतर ऐश्वर्या यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. पण यावेळी त्यांनी कोणत्याही कोचिंगमध्ये सामील न होता स्वतः अभ्यास करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
कंटाळा व थकवा घालण्यासाठी हटके उपाय..
यूपीएससी मुख्य परीक्षेची तयारी करताना कंटाळा व थकवा जाण्यासाठी म्हणून ऐश्वर्या ऑल इंडिया रेडिओवरील स्पॉटलाइट ऐकायची की, लोकसभा आणि राज्यसभा टीव्ही पाहायची.
दररोज वेळापत्रक
तिने संपूर्ण महिन्याचे वेळापत्रक तयार करण्यापेक्षा दररोज वेळापत्रक तयार केले.
UPSC परीक्षेतील यशाचा फॉर्म्युला
UPSC परीक्षेतील यशाचा फॉर्म्युला म्हणजे दररोज अभ्यास करणे, असे तिचे मत आहे.
जमावाचा हल्ला
कोल्हापूरमध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक असताना त्यांनी टीमसह एका मटक्याच्या अड्ड्यावर धाड टाकली होती. पण त्यांच्या टीमवर मटका व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती आणि जमावानं हल्ला चढवला होता.
40 हून अधिक यशस्वी धाडी
यानंतर त्यांनी कंट्रोल रूमला याबाबतची माहिती दिली आणि काही क्षणांतच पोलिसांचा मोठा फौजफाटा तेथे दाखल झाला आणि शर्मा यांच्यासह संपूर्ण टीमची सुटका केली. पण याच अनुभवातून धडा घेत त्यांनी पुढे 40 हून अधिक यशस्वी धाडी टाकल्या.
वडीलच आयडॉल
ऐश्वर्या या त्यांच्या वडिलांनाच आयडॉल मानतात. श्री. ए. के. शर्मा हे एक आयपीएस अधिकारी होते आणि त्यांची आई गृहिणी आहे.
परीक्षेसाठी महत्त्वाची ट्रिक
ऐश्वर्या यांचा उत्तरे लिहिताना तुम्हाला खूप धावपळ करावी लागत नाही. मुख्य परीक्षेतील प्रश्नांची उत्तरे देताना तुम्ही मुद्देसूद असले पाहिजे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.