राज्य सरकारने एकीकडे लाडक्या बहिण योजनेची पडताळणी सुरू आहे. अनेक बहिणींना योजनेतून वगळण्यात आलं आहे. तर दुसरीकडे, महिलांना लालपरीच्या प्रवासात ५० टक्के सूट अर्थात अर्ध तिकीट दिले होते, यामुळे एसटी महामंडळाला दिवसाला ३ कोटीचा तोटा झाला, अशी कबुलीच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
तसंच, आता यापुढे एसटीत कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही, असं सरनाईकांनी स्पष्ट केलं. 'व्हाईस ऑफ मीडिया' या पत्रकार संघटनेच्या कार्यक्रमासाठी प्रताप सरनाईक हे धाराशिव शहरात आले होते. महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत या योजनेमुळे एसटी तोट्यात गेल्याचा आरोप राज्य सरकारवर वारंवार करण्यात आले आणि सरकारने फेटाळत आले आहे. मात्र आज अखेर यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक बोलले.
'पत्रकारांना एसटीमध्ये सवलत द्या' अशी मागणी सरनाईक यांच्याकडे करण्यात आली यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सवलतीमुळेच एसटी बस तोट्यात गेल्याचे वक्तव्य केलं. 'आता लाडक्या बहिणींना ५० टक्के सवलत, ७५ टक्क्यांवरील ज्येष्ठांना सवलत दिली आहे. त्या सवलतीमुळे परिस्थिती अशी झाली आहे की, महामंडळ दर दिवसाला ३ कोटी तोट्यात आले. आता अशा मागण्यामुळे सगळ्यांना मोफत सवलत देता येणार नाही. जर अशाच प्रकारे सवलत देत राहिलो तर एसटी महामंडळ चालवणे कठीण होऊन जाईल. त्यामुळे अशा सवलतीचा विचार करता येणार नाही. एसटीची सेवा ही तळागळातील लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. पण माझा संकल्प आहे की आदिवासी बांधवापर्यंत, त्यांच्या पाड्यापर्यंत एसटी बस पोहोचली पाहिजे. या मी मताचा आहे' असं यावेळी सरनाईक म्हणाले.
जिल्हाधिकारी परत यायला तयार नाही - प्रताप सरनाईक
दरम्यान, 'मी जिल्हाधिकारी यांची झालेली बदली कॅन्सल करून आणतो असे मी जिल्हाधिकारी यांना म्हणलो, तरी ते ऐकत नाहीत. असं वक्तव्य धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी भर बैठकीत केलं आहे. धाराशिवची जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांची दोन दिवसापूर्वी सोलापूर महानगरपालिका आयुक्तपदी बदली झाली आहे. तुळजापुरात सध्या शिवसेनेच्या वतीने मोफत हॉस्पिटल उभारणीचे काम सुरू आहे. त्याचीच पाहणी प्रताप सरनाईक यांनी केली यावेळी बैठकीत अधिकाऱ्यांशी चर्चा करताना "आता हे काम अंतिम टप्प्यात आलं आहे. पण योगायोगाने जिल्हाधिकारी यांची बदली झाली. मी ही बदली कॅन्सल करून आणतो म्हटलं तरी जिल्हाधिकारी नको म्हणतात' असं प्रताप सरनाईक म्हणाले. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.