Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

काश्मिरी गायिका शमिमा अख्तर यांनी गायले महाराष्ट्र गीत आणि पसायदान

काश्मिरी गायिका शमिमा अख्तर यांनी गायले महाराष्ट्र गीत आणि पसायदान


नवी दिल्ली इथे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे  उद्घाटन शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले.

विशेष म्हणजे मूळच्या कश्मीरच्या बांदीपोरा येथील असलेल्या सुप्रसिद्ध गायिका शमिमा अख्तर यांनी उद्घाटन सोहळ्याच्या सुरुवातीला महाराष्ट्र गीत गायले. एका काश्मिरी गायिकेने 'जय जय महाराष्ट्र माझा' हे महाराष्ट्र राज्य गीत गायले तेव्हा विशेष उत्साह सभागृहात दिसून आला. कार्यक्रमाच्या शेवटी शमिमा अख्तर यांनी आपल्या मधुर आवाजात पसायदानदेखील सादर केले. त्यांच्या महाराष्ट्र गीत गायनाने आणि पसायदानाने उपस्थित्यांना त्यांनी मंत्रमुग्ध केले. शमिमा अख्तर सुप्रसिद्ध गायिका असून साहित्य संमेलन आयोजक संस्था सरहदशी त्या संबंधित आहेत.

 
कोण आहेत शमिमा अख्तर? 

शमिमा अख्तर यांनी मराठीसह कानडी, बंगाली, डोंगरी, पंजाबी, संस्कृत आणि काश्मिरी भाषांमध्ये गाणी गायिली आहेत. सरहद म्युझिकच्या युट्यूब चॅनेलवर शमिमा यांनी गायिलेल्या "लाभले आम्हास भाग्य" या मराठी गाण्याचा व्हिडिओदेखील आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.