Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आदित्य ठाकरेंना कोणत्याही क्षणी अटक, ठाकरेंच्या माजी नेत्याचा दावा

आदित्य ठाकरेंना कोणत्याही क्षणी अटक, ठाकरेंच्या माजी नेत्याचा दावा




आदित्य ठाकरे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, असा दावा किशोर तिवारी यांनी केला आहे. पंतप्रधान मोदी यांची जेव्हा इच्छा होईल, तेव्हा कोणत्याही क्षणी आदित्य ठाकरे यांना दिशा सालियन प्रकरणात  अटक होऊ शकते, असा दावा तिवारी यांनी केला आहे. किशोर तिवारी हे याआधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनामध्ये होते. काही दिवसांपूर्वी किशोर तिवारी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. आदित्य ठाकरे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, असा दावा तिवारी यांनी केला आहे. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. 

 
दिवंगत अभिनेते सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन यांनी आत्महत्या केली होती. दिशा सालियन प्रकरणासंदर्भात आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. दिशा सालियन यांनी आत्महत्या केली नाही, त्यांचा जीव घेतला गेला. यामध्ये आदित्य ठाकरे यांचा हात असल्याचा दावा राणे यांनी केला होता. आता किशोर तिवारी यांनी याप्रकरणात खळबळजनक दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेव्हा इच्छा होईल, तेव्हा आदित्य ठाकरे यांना अटक होईल, असे किशोर तिवारी म्हणाले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर किशोर तिवारी यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांवर गंभीर टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीला काही नेते जबाबदार असल्याचा दावा त्यांनी केला होता. संजय राउत, विनायक राउत, अरविंद सावंत आणि मिलिंद नार्वेकर यांनी मातोश्री आणि शिवसेना भवनावर कब्जा केल्याचा दावा केला होता. त्यानंतर तिवारी यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली होती. 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.