राज्य सरकारची लाडकी बहीण योजना ही अल्पावधित लोकप्रिय झालेली योजना आहे. राज्यातील जवळपास अडीच कोटी महिलांना या योजनेचा फायदा झालेला आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 1500 रुपये दिले जातात.मात्र आता काही महिलांना केवळ 500 रुपये
देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामागे काय कारण आहे?
कोणत्या महिलांना फक्त 500 रुपये मिळणार याबाबत सविस्तर माहिती जाणून
घेऊयात.
दोन सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना फटका बसणार
राज्य
सरकारने लाडकी बहीण योजनेसह इतर सरकारी योजनांचे लाभ घेत असलेल्या
महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही अशी माहिती दिली होती. आता या
नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार
जवळपास सव्वा आठ लाख महिला या दोन योजनांचा लाभ घेत असल्याचे समोर आले
आहे, त्यामुळे आता या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नसल्याची माहिती समोर
आली आहे.
या महिलांना केवळ 500 रुपये मिळणार
समोर आलेल्या माहितीनुसार, नमो शेतकरी आणि लाडकी बहीण या दोन्ही सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या 8 लाखांपेक्षा जास्त आहे. नमो शेतकरी योजनेअंतर्गत महिलांना 12000 रुपये दिले जातात. यात राज्य सरकारचे 6 हजार रुपये आणि केंद्र सरकारच्या 6 हजार रुपयांचा समावेश आहे. मात्र लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार, लाभार्थी महिलांना शासकीय योजनेमधून वर्षाला 18 हजार रुपयांपेक्षा जास्त लाभ दिला जाणार नाही. त्यामुळे आता या महिलांना लाडकी बहीण योजोनत वार्षिक 18 हजार रुपयांऐवजी केवळ 6 हजार रुपयेच मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच दर महिन्याला 1500 रुपयांऐवजी केवळ 500 रुपये दिले जाण्याची शक्यता आहे. 'लोकमत'नं याबाबत वृत्त दिले आहे.
लाभ कमी करण्याचा प्रस्ताव
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील सव्वा आठ लाख महिलांना नमो शेतकरी योजनेचे 12 हजार रुपये मिळत आहेत. आता या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत 6 हजार रुपये म्हणजे दरमहा 500 देण्याचा प्रस्ताव माडण्यात आला आहे. त्यामुळे आता आगामी काळात या सव्वा आठ लाख महिलांना केवळ 500 रुपये दिले जाण्याची शक्यता आहे. हा निर्णय अंमलात आल्यास सरकारी तिजोरीवरील 1400 कोटींचा बोजा कमी होण्याची शक्यता आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.