छत्रपती संभाजीनगर : राज्यातील लाडक्या बहिणींचं १५०० रुपयांऐवजी २१०० कधी मिळणार, याकडे लक्ष लागलं आहे. लाडक्या बहिणींना २१०० रुपये न मिळवण्यावरून विरोधकांकडून टीका केली जात आहे. आता याच योजनेवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं भाष्य केलं. 'लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणे अवघड
जात आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनामुळे महिलांनी मतदान केले आहे. पुढच्या
बजेटआधी लाडक्या बहिणींचे पैसे द्यावेत, असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास
आठवले यांनी केलं आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे
छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, रामदास आठवले यांनी
राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केलं. केंद्रीय रामदास आठवले सोमनाथ
सूर्यवंशी प्रकरणावर म्हणाले, 'सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली.
दलितांकडे कमी लक्ष दिलं जातंय. राज्य सरकारने खासगी क्षेत्रात देण्याचा
निर्णय घ्यावा. भाऊराव पाटील यांनी कमावा आणि शिका योजना सुरु केली. तशीच
योजना सुरु करून महिना ५-१० हजार रुपये द्यावेत'.
औरंगजेबाच्या मुद्यावर भाष्य करताना आठवले म्हणाले, 'छत्रपती संभाजी महाराजांनी जबरदस्त कर्तुत्व निर्माण केलं आहे. तो चांगला प्रशासक म्हणणे चुकीचे आहे. औरंगजेबाचा विनाकारण हा विषय काढू नये. कबर हटवण्याचा मागणीला आमचा पाठिंबा नाही. कबर हटवू नका, मात्र छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक असावे. नागपुरात पूर्वनियोजन करून हिंसाचार घडवला. हिसांचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. हिंदूंना सांगतो की शांत राहा. विनाकारण वाद निर्माण करू नका. मुस्लीम समाजाने आपले नाते औरंगजेबाशी जोडू नये'.महाबोधी विहाराच्या वादावर बोलताना आठवले म्हणाले, 'गया येथील बौद्ध विहार आमच्या ताब्यात द्या. मी स्वत: बौद्ध गया येथे जाणार आहे. आताचे ट्रस्टी रद्द करा. बौद्ध धर्माच्या ट्रस्टमध्ये इतारांना घेऊ नये'. महायुतीच्या पालकमंत्रिपदाच्या वादावरही आठवलेंनी भाष्य केलं. ' पालकमंत्रिपदाचा वाद मिटवायचा असेल, तर आरपीआयला मंत्रिपद द्या'. दिशा सालियन प्रकरणावरही आठवलेंनी भाष्य केलं. 'दिशा सालियानच्या वडिलांनी चार नाव असलेले पत्र दिले. त्यात हत्या करणाऱ्यांच्या नावे होते. तिची हत्या झाली हे पालकांनी सांगितले. माझे असे म्हणणे नाही की, आदित्य ठाकरे यांच्यावर कारवाई करू नका. कुणीही असेल तर कारवाई करावी'.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.