मुंबई : दिशा सालियान मृत्यू प्रकरणी तिचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आपल्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप दिशा सालियानच्या वडिलांनी केला आहे. या याचिकेमधून सतीश सालियान यांनी आदित्य ठाकरे, दिनो मोरिया, सुरज पांचोली आणि रिया चक्रवर्ती यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.
दिशाच्या वडिलांच्या याचिकेत नेमकं काय?
1- 8 जून 2020 ला दिशाच्या मालाडमधील घरी पार्टी आयोजित करण्यात आली होती.2 या पार्टीला रोहन राय आणि मित्र उपस्थित होते3 दिशाच्या पार्टीत आदित्य ठाकरेही पोहोचले4 या पार्टीला आदित्य ठाकरेंसह सूरज पांचोली, दिनो मोर्याही हजर होते.5 दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली.6 बलात्काराचा उल्लेख पोस्टमॉर्टेममधून वगळण्यात आला.7 योग्य पोस्टमॉर्टेम न करता दिशावर अंत्यसंस्कार करण्यात आले8 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गेला.9 दिशाच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरेंकडून पोलिसांना अनेक फोन केले गेले.10 प्रत्यक्षदर्शींना धमकावण्याचा प्रयत्न झाला11- 14 व्या मजल्यावरून पडूनही दिशाच्या शरीरावर जखमा नाहीत12 दिशाच्या इमारतीमधील CCTV फुटेज गायब केले गेले13 तपासात आरोपींच्या मोबाईल लोकेशनकडे दुर्लक्ष केलं गेलं.14 दिशाच्या मृत्यू प्रकरणाची महाराष्ट्राबाहेर सुनावणी घेण्यात यावी15 आदित्य ठाकरे, किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.16 तपासात आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेंना पाठीशी घालू नये17 आदित्य ठाकरेंचे मोबाईल लोकेशन, CDR कोर्टात सादर केले जावे.18 कोर्टाच्या मार्गदर्शनात CBI मार्फत तपास केला जावा.
8 जूनला नेमकं काय झालं?
दिशा
सालियान या अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या व्यवस्थापक होत्या. 8 जून
2020 ला मुंबईमध्ये घराच्या बालकनीमधून खाली पडून दिशा यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येची नोंद केली होती. पोलिसांनी दिलेल्या
माहितीनुसार मृत्यूपूर्वी दिशाने आपल्या लंडनमधील एका मैत्रिणीला फोन केला
होता. आपल्या मैत्रिणीशी बोलताना दिशा थोडी चिंतेत वाटत होती. वर्कलोड
जास्त असल्याचं तिने आपल्या मैत्रिणीला सांगितलं. त्यानंतर थोड्याचवेळात
तिचा होणारा नवरा रोहन याने दिशा ज्या खोलीत राहात होती त्या घराचा दरवाजा
उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र दिशा त्या खोलीमध्ये नव्हती. त्याने
खिडकीतून खाली पाहिलं असता दिशा पडलेली दिसली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.