Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'औरंगजेबाची कबर, पुढची अयोध्या होणार'; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप

'औरंगजेबाची कबर, पुढची अयोध्या होणार'; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप
 

खुल्ताबादमधील औरंगजेबाची कबरीवरुन राज्यात वाद पेटलाय. एवढंच नाही तर या वादावरून थेट मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये दंगल उसळलीय. त्यावर प्रकाश आंबेडकरांनी भाष्य करत औरंगजेबाची कबर पुढची अयोध्या होण्याचा खळबळजनक दावा केलाय. राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याचं संरक्षण असलेली औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी जोर धरु लागली. त्यातच विश्व हिंदू परिषदेने औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी कारसेवेचा इशारा दिला. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही औरंगजेबाची कबर हटवण्याची भूमिका घेतलीय.

राहत इंदोरींच्या शायरीचा आधार घेत नागपूर में तनाव है क्या, कुछ पता तो करो, सर पर चुनाव है क्या? असं म्हटलं जातंय. मात्र कुठलीही निवडणूक नसताना औरंगजेबावरुन वातावरण तापवण्यामागे पुढच्या लोकसभा निवडणुकीचं गणित असल्याचा दावा आंबेडकरांनी केलाय. त्यामुळे निवडणूका जिंकण्यासाठी लोकांचे संसार उध्वस्त केले जात आहेत का? याबरोबरच औरंगजेबाच्या कबरीचा वाद दुसरी आयोध्या होण्याइतका तापणार का? याकडे लक्ष लागलंय.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.