Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संतोष देशमुख प्रकरणी उज्जवल निकमांनी 30 मिनिटात सगळी कुंडली मांडली, कराडचा वकिल म्हणाला, 'आम्हाला...

संतोष देशमुख प्रकरणी उज्जवल निकमांनी 30 मिनिटात सगळी कुंडली मांडली, कराडचा वकिल म्हणाला, 'आम्हाला...
 

बीड: संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीड न्यायालयात सुनावणी पार पडला. विशेष सरकारी वकील उज्वल निकम या सुनावणीला उपस्थित राहिले. उज्वल निकम हे बीड जिल्हा न्यायालयात संतोष देशमुख प्रकरणातील सुनावणीसाठी पहिल्यांदाच कोर्टात उपस्थित राहिले. सुरक्षा आणि इतर कारणांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी ही केज कोर्टाच्या ऐवजी बीडमध्ये पार पडली. विशेष सरकारी वकील अॅड. उज्जवल निकम यांनी आपल्या युक्तिवादात वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीची सगळी कुंडली मांडली. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीला कोर्टात आज सुनावणी पार पाडली. या प्रकरणातील आरोपी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. सुनावणीच्या सुरुवातीला विशेष सरकारी वकील अॅड. उज्जवल निकम यांनी आपल्या युक्तिवादाला सुरुवात केली.



 
 आज बीड कोर्टात सुनावणी दरम्यान नेमकं काय झालं?

- वाल्मिक कराड याने खंडणी जगमित्र कार्यालयात मागितली असल्याचे अॅड. निकम यांनी सांगितले.

- खंडणी प्रकरणाचा घटनाक्रम अॅड.निकम यांनी मांडला.

- खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड यांचा सहभाग आणि खंडणी प्रकरणाचा घटनाक्रम अॅड. उज्जवल निकम यांनी उलगडून दाखवला.

- मारहाणीत सुदर्शन घुले गँगचा लीडर आहे. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून खंडणी मागितल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

- वाल्मिकी कराड याच्या आवाजाचे नमुने तपासले आहेत. आवाज ओळखण्यात आला असल्याचे अॅड. निकम यांनी सांगितले.

- 29 नोव्हेंबर रोजी हे खंडणी प्रकरणात बरच काही घडलं.

- विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये 29 तारखेला बैठक झाली. त्यावेळी सर्व आरोपी हजर होते.

- 8 डिसेंबर रोजी हॉटेल तिरंगा नांदुर फाटा येथे विष्णू चाटे सुदर्शन घुले याची बैठक झाली.

- संतोष देशमुख खंडणी प्रकरणात आडवे येत आहेत, असं विष्णू चाटेंनी सांगितले. यावेळी त्याला कायमचा धडा शिकवा असे सांगितलं.

- खंडणी आणि हत्या ही संपूर्ण घटना कट रचून केली असल्याचे अॅड. उज्जवल निकम यांनी सांगितले.
 


आरोपींचे वकील विकास खाडे यांनी युक्तिवाद केला.

- मागच्या सुनावणीच्या वेळी दिलेल्या संदर्भात पूर्तता नाही. डिजीटल पुरावे, सीडीआर आणि जवाब मिळाले नसल्याची बाब अॅड. खाडे यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली.

- दोषारोपत्रातील माहिती अद्याप मिळाले नाही

- आरोप निश्चितीसाठी सरकारी पक्षाला एवढी घाई का झाली आहे, असा प्रश्न आरोपींचे वकील अॅड. खाडे यांनी केला.

- आरोपीच्या वकिलांनी मागितलेले सर्व डिजिटल पुरावे व कागदपत्रे देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

- तपास अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची कॉपी आरोपींच्या वकिलांनी दिली.

विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम यांनी हा खटला आरोप निश्चित करण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. मात्र आरोपीच्या वकिलाने त्यांना कागदपत्रे न मिळाल्यामुळे आरोप निश्चित न करण्याची मागणी केली. आता या प्रकरणी पुढील सुनावणी ही 10 एप्रिल रोजी होणार आहे.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.