मिरज तालुक्यात जनसुराज्य शक्ती पक्षाची जोरदार पक्ष बांधणी सुरू:, समित दादा कदम
मिरज तालुक्यात जनसुराज्य शक्ती पक्षाची जोरदार पक्ष बांधणी सुरू ,वड्डी, करोली एम, भोसे ,सांबारवाडी, कवलापूर येथील सरपंच ग्राम पंचायत सदस्य गट नेते आणि अजी माजी सरपंच यांचा पक्षात जाहीर प्रवेश , आगामी निवडणुकीत महायुतीतील अग्रेसर घटक पक्ष म्हणून जनसुराज्य शक्ती पक्ष असणार, समित दादा कदम
आगामी महापालिका ,जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यामध्ये पक्ष बांधण्याची यशस्वी घोडदौड सुरू आहे आज मोठ्या प्रमाणात. शहर आणि ग्रामीण भागातील नेते इतर पक्षांतील पदाधिकारी कार्यकर्ते जनसुराज्य शक्ती पक्षा मध्ये प्रवेश करत असून , पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनयजी कोरे सावकार तसेच प्रदेश अध्यक्ष समित दादा कदम यांच्या विकासात्मक भूमिके वर
विश्वास वाढल्याने अनेक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते हे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वाटेवर आहेत ,आज वड्डी, करोली एम, भोसे ,सांबारवाडी, कवलापूर येथील आजी माजी सरपंच विद्यमान सरपंच ग्रामपंचायत सदस्य गटनेते सोसायटीचे आजी-माजी चेअरमन यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी प्रदेश अध्यक्ष समित दादा कदम यांच्या हस्ते वड्डी गटनेते महेंद्रसिंह शिंदे सरकार
कारोली एम सांभारवाडी सरपंच अशोक शिंदे
करोली यम सोसायटी विद्यमान चेअरमन सुरेश आबा देशमुख
माजी सरपंच तानाजी बंडू चव्हाण
शुभम सूर्यकांत, चंद्रकांत बसतवडे
कवलापूर गावचे युवा नेते प्रमोद पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला , आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अग्रेसर म्हणून जनसुराज्य शक्ती हा घटक पक्ष असेल असा विश्वास यावेळी समित दादा कदम यांनी व्यक्त केला ,
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.