Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारतीय वंशाचे प्रदीप पटेल आणि त्यांच्या मुलीची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या

भारतीय वंशाचे प्रदीप पटेल आणि त्यांच्या मुलीची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या
 

वोंशिंग्टन , 23 मार्च अमेरिकेत एका वडिलांची आणि त्याच्या मुलीची हत्या करण्यात आली आहे.या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे. अमेरिकेतील व्हर्जिनिया या ठिकाणी एका स्टोअरमध्ये गोळीबार करण्यात आला.या गोळीबारात ५६ वर्षीय वडील आणि मुलगी या दोघांची हत्या करण्यात आली.

मीडिया रिपोर्टनुसार, व्हर्जिनियामध्ये एका स्टोअरमध्ये २० मार्चला गोळीबार करण्यात आला. या घटनेत प्रदीप कुमार पटेल आणि त्यांची २४ वर्षीय मुलगी उर्वी या दोघांचीही हल्लेखोराने हत्या केली. सकाळी साडेपाचच्या दरम्यान आरोपी मद्य खरेदी करण्यासाठी स्टोअरमध्ये आला होता. त्यावेळी त्याचा स्टोअर मालकाशी वाद झाला. यावेळी त्याने प्रदीप कुमार पटेल आणि त्यांच्या मुलीवर गोळीबार केला.ही घटना २० मार्चला पहाटे ५.३० मिनिटांनी लँकफोर्ड हायवे या ठिकाणी असलेल्या स्टोअरमध्ये घडली आहे. दरम्यान या घटनेत एका महिलेलाही गोळी लागली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. जॉर्ज फ्राझइर असं या ४४ वर्षीय संशयिताचं नाव आहे. त्याला अॅकोमॅक येथील तुरुंगात पाठवण्यात आलं असून त्याच्याविरोधात हत्येचा प्रयत्न, हत्या, घातकी शस्त्र बाळगणं आणि त्याचा वापर करणं या सगळ्या कलमांचे गुन्हे लागू करण्यात आले आहेत. अॅकोमॅकचे शेरीफ यांनी ही माहिती दिली. 

प्रदीपभाई पटेल यांना तीन मुली होत्या. प्रदीप पटेल आणि त्यांची मुलगी उर्वी सहा वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्य करत होते. प्रदीप पटेल आणि उर्वी यांच्या मृत्यूची माहिती मिळताच त्यांच्या मुली आणि जावई अमेरिकेत पोहचले आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तेथील गुजराती समाजाने शोक व्यक्त केला आहे. या घटनेनंतर पटेल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.