Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजप नेत्याचा आपल्याच कुटुंबावर गोळीबार; तीन मुलांचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी

भाजप नेत्याचा आपल्याच कुटुंबावर गोळीबार; तीन मुलांचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी
 

भाजप नेत्याने आपली पत्नी आणि तिन्ही मुलांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये घडली आहे. या घटनेत तिन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. तर, पत्नीवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणानंतर आरोपी पलायन करण्याच्या तयारीत होता. मात्र, गावकऱ्यांनी त्याला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. पत्नीवर असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून त्याने पत्नी आणि मुलांवर गोळ्या झाडल्याची माहिती आहे. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

योगेश रोहिला असे आरोपीचे नाव आहे. तो भाजप पक्षातील कार्यकारिणी सदस्य आहे. योगेशला त्याची पत्नी नेहाबद्दल संशय होता. पत्नीचे अनैतिक संबंध सुरू आहेत, असे त्याला वारंवार वाटत होते. या कारणावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण होत. शनिवारी योगेशला राग अनावर झाला. त्याने बंदूकीचा वापर करून पत्नी आणि मुलांवर गोळ्या झाडल्या.

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पत्नी आणि मुलांना खासगी रूग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तिन्ही मुलांचा मृत्यू तर, पत्नीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबारात श्रद्धा, मुलगा शिवांश आणि देवांश यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना घडल्यानंतर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, गावकऱ्यांनी त्याला पकडले. तसेच मारहाणही केली.

पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आरोपीला अटक केली. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, पत्नीचाही जबाब घेण्यात येणार आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. भाजप नेत्याने आपली पत्नी आणि तिन्ही मुलांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये घडली आहे. या घटनेत तिन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.