Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोलीस ठाण्यात घुसून बड्या पोलीस अधिकाऱ्याला मारहाण, सोलापूरातील खळबळजनक घटना!

पोलीस ठाण्यात घुसून बड्या पोलीस अधिकाऱ्याला मारहाण, सोलापूरातील खळबळजनक घटना!
 

सोलापूर: मागील काही दिवसांपासून सोलापूरसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून गुन्हेगारीच्या विविध घटना समोर येत आहेत. अलीकडेच सोलापूरात एका तरुणाला प्रेम प्रकरणातून बेदम मारहाण झाली होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असताना आता चक्क एका बड्या पोलीस अधिकाऱ्याला काही जणांनी पोलीस ठाण्यात घुसून मारहाण केली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याला अशाप्रकारे मारहाण झालेल्या पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

ही मारहाण सोलापूर शहर हद्दीतील फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना झाली आहे. अरविंद माने असे मारहाण झालेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे नाव आहे. तर नाईटन्या उर्फ ओंकार संतोष नलावडे असे पोलीस निरीक्षकांना मारहाण करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी ओंकार नलावडे विरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीची कसून चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी आरोपी ओंकार नलावडे याच्यासह इतर दोन-तीन लोकांमधील वाद पोलीस ठाण्यात आला होता. त्यांनी एकमेकांविरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणं गाठलं होतं. यावेळी तिघांमधील वाद विकोपाला गेला आणि संतापलेल्या ओंकार नलावडे याने थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्यावरच हात उचलला. त्याने पोलीस ठाण्यातच पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केली.
 
या प्रकरणी नाईटन्या उर्फ ओंकार संतोष नलावडे या आरोपीविरोधात फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी नेमकं काय घडलं? आरोपी ओंकारने थेट पोलिसांवरच हात का उचलला? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाहीये. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.