प्रकाश आंबेडकरांवर वादग्रस्त कमेंट करणं भोवलं, वंचितचे कार्यकर्ते आक्रमक, तरुणाची धिंड काढत मारहाण, तेल्हारा शहरात तणाव
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत समाजमाध्यमध्ये वादग्रस्त कमेंट करणे तरुणाला चांगलेच भोवले आहे. यावरुन वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. वंचितच्या कार्यकर्त्यांनी त्या तरुणाला चांगलाच चोप दिला आहे. तसेच वंचितच्या कार्यकर्त्यांनी या तरुणाची धिंड काढली आहे. ही घटना अकोला जिल्ह्यातील तेल्हारा शहरात घडली आहे. तरुणाच्या वादग्रस्त कमेंटनंतर तेल्हारा शहरात काही काळ तणावाची परिस्थिती होती.
पोलिसांनी मध्यस्थी करत पोस्ट करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतलं
तेल्हारा शहरातील हरिओम नागोलकार या तरुणाने प्रकाश आंबेडकरांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. ऐनवेळी तेल्हारा पोलिसांनी मध्यस्थी करत पोस्ट करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. यादरम्यान आंबेडकर यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत तेल्हारा पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार नोंदवण्यासाठी दाखल झाले आहेत. या प्रकरणात पुढील कारवाईची प्रक्रिया सुरु आहे. सद्यस्थितीत तणावपूर्ण शांतता आहे. कुणीही कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन अकोला पोलिसांनी केले आहे. सद्यस्थितीत तेल्हारा शहरात मुख्य चौकात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.