कामात कुचराई; पोलिस व वन अधिकारी निलंबीत
वर्धा: Sumit Wankhede खरांगणा पोलिस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या बोरगाव गोंडी येथील नारायण कौरती यांच्या शेतात जाऊन वनविभागाचे अधिकारी ताल्हन आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी तू जंगलात आग लावल्याचा आरोप करून मारहाण केली होती. या प्रकरणी कौरती यांनी खरांगणा पोलिसात तक्रार दिल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यान सहाय्यक पोलिस निरीक्षक ढाकणे यांना काल रात्री निलंबीत करण्यात आले तर वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी ताल्हन यांचे निलंबीत करण्यात आले.
या प्रकरणी आ. सुमित वानखेडे यांनी 17 रोजी अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला होता, हे उल्लेखनिया मिळालेल्या माहितीनुसार, वन परिक्षेत्र अधिकारी ताल्हन आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी कौरती यांच्या शेतात जाऊन तू जंगलात आग लावत असल्याचे म्हणून हातपाय बांधून त्यांना मारहाण केली होती. घटनेनंतर कौरती यांनी खरांगणा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. मात्र, खरांगणा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ढाकणे यांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. मारहाण केली तेव्हा वनविभागाचे अधिकारी दारू पिऊन असल्याचेही कौरती यांनी पोलिसांना सांगितले. परंतु, ढाकणे यांनी कोणतीही कारवाई न करतान अदखलपात्र गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आ. वानखेडे यांनी सोमवार 17 रोजी अधिवेशनात मुद्दा उपस्थित करून पोलिस प्रशासनावर ताशेरे ओढले. कौरती यांचा मुलगा सैनिक आहे.
सैनिकाच्या परिवाराला अशा प्रकारचा त्रास दिल्या जात असल्याचेही आ. वानखेडे यांनी लक्षात आणून देत या प्रकरणात सैनिक विभागाला हस्तक्षेप करावा लागला ही बाब सुद्धा पोलिस प्रशासनाला लाजिरवाणी असल्याचे सभागृहाच्या लक्षात आणून दिले. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुद्धा या प्रकरणात तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, पोलिस अधीक्षक जैन यांनी ढाकणे यांनी वनविभागाच्या चारही अधिकाऱ्यांना मदत केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई केली. ढाकणे यांना पोलीस नियंत्रण कक्ष येथे जोडल्याचे पोलिस अधीक्षक जैन यांनी सांगितले. या प्रकरणी वनविभागानेही चौकशी केली. त्यात ताल्हन दोषी आढळून आल्याने त्यांनाही शासनाने निलंबीत केले असल्याची माहिती डीएफओ ठेंगडी यांनी दिली. शेतकऱ्याचे बयाण अप्राप्त असल्याचेही ठेंगडी यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.