Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अजिंकीयन फाऊंडेशनच्या वतीने सांगलीत २२ व २३ मार्चला ऐशानी प्रदर्शन.. मंजिरी गाडगीळ महिलांसाठी साड्या, ड्रेस मटेरियल, कॉस्मेटिक्स,ज्वेलरी, खाद्यपदार्थ यांची रेलचेल...

अजिंकीयन फाऊंडेशनच्या वतीने सांगलीत २२ व २३ मार्चला ऐशानी प्रदर्शन.. मंजिरी गाडगीळ महिलांसाठी साड्या, ड्रेस मटेरियल, कॉस्मेटिक्स,ज्वेलरी, खाद्यपदार्थ यांची रेलचेल...  

 
सांगली, दि.१९: अजिंकीयन फाऊंडेशनच्या वतीने शनिवारी (२२ मार्च) व रविवारी ( २३ मार्च ) रोजी खास महिलांसाठी साड्या ड्रेस मटेरियल कॉस्मेटिक्स ज्वेलरी फॅशन ॲक्सेसरीज यांचे भव्य प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आले आहे. सांगलीतील नेमिनाथनगर येथील राजमती भवनात सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत हे प्रदर्शन भरणार आहे. ही माहिती अजिंकियन फाउंडेशनच्या प्रमुख सौ. मंजिरी गाडगीळ यांनी दिली.

प्रदर्शनाचे उद्घाटन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ. वर्षाताई  भोसले यांच्या हस्ते २२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. खास सांगलीकरांसाठी सांगलीकरांचे असलेले हे फाउंडेशनतर्फे पंधरावे प्रदर्शन सांगलीत होत आहे. यापूर्वी गेल्या सात वर्षात फाउंडेशनने १४ प्रदर्शने यशस्वीरित्या भरवली आहेत.
 
साड्या, ड्रेस मटेरियल, कुर्तीज, कॉस्मेटिक्स, ज्वेलरी, फॅशन, अॅक्सेसरीज, दोहर, बेडसीटस्, होम डेकोर, खाद्यपदार्थ, हातमाग खादी, नर्सरी, घरगुती पदार्थ, मसाले, चटण्या आणि चमचमीत ताज्या खाद्यपदार्थांची रेलचेल या प्रदर्शनात असेल. २२ मार्च रोजी दुपारी पाच वाजता झी मराठीतर्फे आणि २३ मार्च रोजी दुपारी चार वाजता गृहलक्ष्मीतर्फे खास महिलांसाठी विविध स्पर्धा, फनी गेम्स आणि आकर्षक गिफ्ट वस्तू असा उपक्रम होणार आहे. महिला व पुरुषांसाठी या प्रदर्शनात मोफत प्रवेश असेल. महिलांनी स्टॉल बुकिंगसाठी फाऊंडेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन  मंजिरी गाडगीळ यांनी केले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.