बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यातलं वातावरण तापलं आहे. त्यातच आता जळगावात माजी उपसरपंचाची भोसकून हत्या केल्याची घटना घडलीय. जळगावातील कानसवाडा गावच्या माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आली. चॉपर आणि चाकून उपसरपंचांवर वार करण्यात
आले. युवराज सोपान कोळी असं मृत्यू झालेल्या माजी उपसरपंचाचे नाव आहे. या
घटनेनंतर जळगावात खळबळ उडालीय.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, जळगावातील कानसवाडा गावचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांच्या हत्येची घटना आज सकाळी घडली. या प्रकारामुळे मोठी खळबळ उडालीय. युवराज कोळी हे शिंदे गटाचे कार्यकर्ते होते ते कानसवाडा गावचे माजी उपसरपंच होते. गावातल्याच तिघांनी सकाळी आठ वाजता युवराज कोळी यांच्यावर हल्ला केला. चाकू आणि चॉपरने त्यांच्यावर वार करण्यात आले. हे वार वर्मी लागल्यानं युवराज कोळी हे जागीच कोसळले. त्यांना रुग्णालयात नेलं पण त्यांचा मृत्यू झाला होता. युवराज कोळी यांच्या नातेवाईकांनी आक्रोश व्यक्त करत दोषींना लवकरात लवकर ताब्यात घ्यावं अशी मागणी केलीय. दरम्यान, खुनाचं नेमकं कारण समोर आलेलं नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.