जयकुमार गोरे यांच्या बदनामी व ब्लॅकमेलिंग प्रकरणात रोहित पवार, सुप्रिया सुळे यांचेवर हक्क भंग आणून खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी करून लवकरात लकवर अटक करावी, अशी मागणी ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी केली आहे. युट्युबर तुषार खरात, खंडणी घेणारी
महिला आणि रोहित पवार, सुप्रिया सुळे एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांनी
व्हिडीओ पाठवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं
होतं. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीही रोहित पवार आणि सुप्रिया सुळे
यांना सहआरोपी करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
रोहित पवार आणि सुप्रिया सुळे आणि इतर
आरोपींनी संगनमताने कट रचला गेला. एका ओबीसी समाजातील उदयोन्मुख नेत्याची
राजकीय, सामाजिक कारकीर्द संपवण्याचे पवार कुटुंबाचे कारस्थान आहे, असा
आरोप देखील ससाणे यांनी केला. जयकुमार गोरे बदनामी प्रकरणात शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार
यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना सह आरोपी केले पाहिजे, अशी मागणी देखील
ससाणे यांनी केली.
सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना सह आरोपी करा- पडळकर
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीही सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. जातीयवाद, गुंडगिरी, भ्रष्टाचार हा पवारांचा गुणच आहे. ते रेकॉर्डवर आणल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष अभिनंदन करतो. माण-खटाव पवारांचा बालेकिल्ला होता. सामान्य कुटुंबातील मुलगा जयकुमार गोरे त्या मतदारसंघाचे चार वेळा आमदार झाले. त्यांना डॅमेज करण्यासाठी 2016 चं प्रकरण ज्यात 2019 मध्ये कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. ती केस पुन्हा उकरून गोरे यांची बदनामी करण्याच प्रयत्न करण्यात आला.
पवार कुटुंबांचा खरा चेहरा समोर आला- पडळकर
मात्र
तपासात जे विषय पुढे आले ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात
मांडले. त्यामध्ये रोहित पवार, सुप्रिया सुळे, प्रभाकर देशमुख यांचे त्या
महिलेला अनेक वेळा फोन गेले. त्या महिलेने या सर्वांना व्हिडीओ पाठवले.
त्यानंतर यांनी ओके सांगितल्यानंतर ते समोर आणले गेले. त्यामुळे पवार
कुटुंबांचा खरा चेहरा देवेंद्र फडणवीसांनी समोर आणला, असं गोपीचंद पडळकर
यांनी म्हटलं.
मुख्यमंत्री सभागृहात काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, "मंत्री जयकुमार गोरे यांच्यासंदर्भात घडलेली घटना दुदैवी आहे. कुणाला जीवनातून उठवण्याच्या उद्देशाने राजकारण होत असेल तर ते चुकीचे आहे. पोलीस तपासात असं निदर्शनास आलं की हे एक नेक्सस होतं. ही महिला, युट्युबर तुषार खरात आणि अनिल सुभेदारसह काही लोकांचा नेक्सस असल्याचं आढळलं. या लोकांनी जो कट रचला याचे सगळे पुरावे सापडले आहेत. यांचे अनेक फोन आहेत, ते सगळे सापडले आहेत.""दुदैवाची गोष्ट म्हणजे या सर्वांशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते थेट संपर्कात दिसत आहेत. प्रभाकरराव देशमुख यांच्याशी आरोपी बोलत होते. त्याहीपेक्षा वाईट वाटतं की सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरातसोबत झाले आहेत. तसेच आरोपींनी तयार केलेले व्हिडीओ देखील त्यांना पाठवण्यात आले आहेत. आता याची चौकशी केली जाणार आहेत", असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.