Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नीने केला आत्महत्येचा प्रयत्न; कारणही आलं समोर.

माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नीने केला आत्महत्येचा प्रयत्न; कारणही आलं समोर.
 

पुणे : राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारानंतर त्यांना तातडीने पुण्यातील रूबी हॉल रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली जात आहे.

प्रसिद्ध उद्योजिका आणि ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या संस्थापक उषा काकडे यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे. महिला आणि बालकांसाठी काम करण्यासाठी ग्रॅव्हिटस फाउंडेशनद्वारे काम करतात. बाललैंगिक शोषणाविरोधात देखील त्या काम करत होत्या. राजकीय पार्श्वभूमी असूनही काकडे यांनी स्वतःची वेगळी वाट निवडून त्या दिशेने आपला प्रवास सुरू ठेवला आहे. माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी या पलीकडची ओळख त्यांनी सामाजिक कार्याच्या परिघात निर्माण केली आहे.दरम्यान, उषा काकडे यांनी झोपेच्या गोळ्यांचे अतिरिक्त सेवन केले. त्यामुळे त्यांना शनिवारी दुपारी 3.30 ते 4 च्या सुमारास त्रास जाणवू लागला. उषा काकडे यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
झोपेच्या गोळ्या घेतल्या जास्त प्रमाणात

उषा यांनी झोपेच्या गोळ्या जास्त प्रमाणात घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी तातडीने पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. कौटुंबिक कारणातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, रुबी हॉस्पिटलने अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती दिली आहे. रुबी हॉल हॉस्पिटलचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी याबाबत माहिती दिली. आता सध्या उषा काकडे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.