उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे ४५ दिवसांच्या महाकुंभमेळ्यात बोट चालवून ३० कोटी रुपये कमावलेले पिंटू महार सध्या चर्चेत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः विधानसभेच्या अधिवेशनात पुष्टी केली की पिंटू महारा यांच्याकडे १३० बोटी आहेत आणि त्यांना दररोज सुमारे २३ लाख रुपये नफा मिळत होता.
पण, ४५ दिवसांत ३० कोटी रुपये कमावणारा पिंटू महारा यालाही कोट्यवधी रुपयांचा कर भरावा लागेल.आता प्रश्न असा निर्माण होतो की एवढ्या मोठ्या उत्पन्नावर पिंटू महारा यांना किती कर भरावा लागेल. भारतात १५ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर ३०% कर भरावा लागतो. आयकर गणनेनुसार, पिंटू महारा यांना सुमारे १२.८० कोटी रुपये कर भरावा लागेल.
एकूण उत्पन्न: ३० कोटी रुपयेउत्पन्न कर: ८,९८,१२,५०० रुपयेअधिभार: ३,३२,३०,६२५ रुपयेआरोग्य आणि शिक्षण उपकर: ४९,२१,७२५ रुपयेएकूण कर देयता: १२.८० कोटी रुपयेजर पिंटू महारा यांनी त्यांचे खर्च कमी करून २० कोटी रुपयांचे निव्वळ उत्पन्न दाखवले तर त्यांची कर देयता ८.५२ कोटी रुपयांपर्यंत कमी होईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.