मिरज : मिरज एसटी आगारात घुसून प्रवाशांच्या नातेवाईकांनी बसचालक व वाहक यांना बेदम मारहाण केली. अजित नाईक व विष्णू नारायण पाटील अशी दोघांची नावे आहेत. हा प्रकार रविवारी दुपारी घडला.
मारहाणीची माहिती मिळताच महात्मा गांधी चौक पोलिसांनी बसस्थानक परिसरात धाव घेतली. याबाबत माहिती अशी, बोरीवली -मिरज (क्र. एमएच14 बीटी 4635) ही बस सांगलीमार्गे मिरजेकडे रविवारी दुपारी आली. सांगलीतील पटेल चौकात न थांबता बस पुढे तरुण भारत स्टेडियम येथे थांबली. एका दिव्यांग प्रवाशाला पटेल चौकात उतरायचे होते. पण बस थांबली नाही. त्यामुळे त्या प्रवाशाचे नातेवाईक संतप्त झाले. नातेवाईकांनी बसचा पाठलाग करत मिरजेत येऊन प्रथम चालक नाईक यांना रस्त्यावर मारहाण केली. त्यानंतर मिरज आगारात येऊन वाहकालाही बेदम मारहाण केली. मारहाणीची घटना समजल्यानंतर महात्मा गांधी चौक पोलिसांनी बसस्थानकावर धाव घेतली. त्यानंतर काही बसचालक व नागरिकांनी वाहकाला प्रवाशांच्या नातेवाईकांच्या तावडीतून सोडविले. रात्री उशिरापर्यंत पोलिसांत तक्रार दाखल नसल्याचे सांगण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.