Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांचे निलंबन; काय आहे प्रकरण?

बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांचे निलंबन; काय आहे प्रकरण? 


मुंबई : बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांचे निलंबन केले जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत केली आहे. कोविड काळात घोटाळा केल्याचा भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी अधिवेशनात लक्षवेधी मांडली. या प्रश्नावर उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधिमंडळात निलंबन करण्यात येईल तसेच तीन महिन्यात विभागीय चौकशी पूर्ण करावी अशी घोषणा केली आहे.

कोविड काळात बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा केला. या घोटाळ्यात डॉ. थोरात दोषी आढळले होते. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांची बीडहून नाशिकला बदली करण्यात आली. परत पुन्हा बीड जिल्ह्यात बदली का? दोषी असतील तर डॉ अशोक थोरात वरती गुन्हा दाखल करणार का? असा सवाल नमिता मुंदडा यांनी केला. तसेच प्राथमिक चौकशीमध्ये डॉ. अशोक थोरात औषध खरेदीमध्ये प्रथमदर्शनी अनियमित्ता आढळून आली, असे भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी अधिवेशनात लक्षवेधी मांडली.
या प्रश्नावर उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधिमंडळात निलंबन करण्यात येईल तसेच तीन महिन्यात विभागीय चौकशी पूर्ण करण्यात येईल अशी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, बीड जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन आणि त्यांच्या कामकाजाबद्दल खूप गंभीर आक्षेप आहेत. निश्चितपणाने सिव्हिल सर्जन अशोक थोरात यांना आपण सस्पेंड करत आहोत. त्यांना निलंबित करून तीन महिन्यांच्या कालावधीत चौकशी पूर्ण करण्यात येईल. या मध्ये जे दोष आढळतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा आरोग्य मंत्री यांनी केली.

कोण आहेत डॉक्टर अशोक थोरात?
डॉ. अशोक थोरात पूर्वी आरोग्य मंत्री विमल मुंदडा यांचे ओएसडी होते. त्यानंतर पुन्हा ते जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून बीडमध्ये रुजू आहेत. या पूर्वी देखील बीडमध्ये ते जिल्हा शल्य चिकित्सक होते. दरम्यान, मस्सोजागचे सरपंच संतोष देशमुख यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट अशोक थोरात यांनी दिला होता. अंजली दमानिया यांनी आरोप केल्यानंतर अंबाजोगाई येथील पियुष इन हॉटेल चर्चेत आले होते. त्यानंतर डॉ. अशोक थोरात यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.