भारताची विश्वविजेती बॉक्सर स्वीटी बोरा आणि तिचा पती आणि माजी आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू दीपक हुडा यांच्यातील सुरू असलेला वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये सुरू असलेल्या कलहामुळे सोशल मीडियावर
तुफान चर्चा होताना दिसते. अशातच आता स्वीटी बोरा हिने चक्क पोलीस ठाण्यातच
नवऱ्यावर हल्ला केल्याचं दिसून आलं आहे. त्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ देखील
तुफान व्हायरल होत आहे.
लग्नाच्या 4 दिवसआधी 2.5 कोटींची मर्सिडीज मागितली - स्वीटी बोरा
आमच्या
लग्नाच्या चार दिवसआधी त्याने 2.5 कोटी रुपयांची मर्सिडीज मागितली आणि
नंतर माझ्या वडिलांनी कर्ज घेऊन त्याला फॉर्च्युनर दिली. माझे वडील अजूनही
फॉर्च्युनरचे हप्ते भरत आहेत, असा आरोप स्वीटी बोरा हिने केला आहे. दीपक
हुडा यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या हुंडा आणि घटस्फोटाच्या प्रकरणात हिसार
पोलिस अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही, उलट आमच्यावर
खोट्या केसेस दाखल केल्या आहेत, असा आरोप स्वीटीने पोलिसांवर केला आहे.
अशातच 15 मार्च रोजी पोलिसांनी दोन्ही पक्षांना बोलावून घेतलं होतं.
15 मार्च रोजी काय झालं?
स्वीटी बोरा हिने तिचा पती दीपक हुड्डा विरोधात छळाचा खटला दाखल केला होता. त्यानंतर, 15 मार्च रोजी पोलिसांनी दोन्ही पक्षांना महिला पोलिस ठाण्यात चर्चेसाठी बोलावलं होतं. दोन्ही पक्ष एसएचओच्या खोलीत बसले असताना अचानक स्वीटी बोरा रागारागात तिच्या पतीचा गळा दाबताना दिसत आहे. ती त्याचा गळा दहा सेकंद दाबून ठेवताना दिसते. पोलिसांनी स्वीटी बोरा, तिचे वडील महेंद्र आणि मामा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, जर मला काही झालं तर तिचा पती दीपक हुडा आणि हिसारचे पोलिस अधीक्षक तिच्या मृत्यूसाठी जबाबदार असतील, कारण पोलिसांनी तिच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई केली नाही. त्यालाच त्रास दिला जात आहे, असं स्वीटी बोरा हिने म्हटलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.