Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सातारा :- प्रतिष्ठित डॉक्टरला अडकवले हनिट्रॅपच्या जाळ्यात, पोलिसांनी असा केला पर्दाफाश

सातारा :- प्रतिष्ठित डॉक्टरला अडकवले हनिट्रॅपच्या जाळ्यात, पोलिसांनी असा केला पर्दाफाश
 

खंडाळा: सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथील प्रतिष्ठीत डॉक्टरला हनिट्रॅपच्या जाळ्यात ओढून त्याच्याकडून तब्बल १ कोटीची खंडणी मागण्यात आली आहे. दरम्यान प्रसंगावधान राखत पावले उचलल्याने आणि पोलिसांना वेळीच माहिती दिल्याने आरोपींचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

6 मार्चपासून हा संपूर्ण प्रकार सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. डॉक्टरच्या दवाखान्यात एक तरुणी कामाला होती परंतु घटनेच्या काही दिवसांपूर्वी ती कामाला येत नव्हती आणि तिचाशी काही संपर्कही होत नव्हता. दरम्यान, तरुणी बेपत्ता झाल्याचे समोर आले या दरम्यान, तरुणीचा एक व्हिडीओ समोर आला. या व्हिडिओत ती संबधीत डॉक्टर बरोबर दिसत होती. याचाच गैरफायदा घेत डॉक्टरांसाठी हनीट्रॅप रचण्यात आला, तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रारही शिरवळ पोलीस स्थानकात करण्यात आली होती. तरुणीसोबत डॉक्टर व्हिडीओमध्ये दिसत असल्याने डॉक्टर घाबरला आणि त्याच्यासाठी रचण्यात आलेल्या हनीट्रॅपमध्ये अडकला.

डॉक्टरला व्हिडीओ सार्वजनिक करायचे नसेल तर १ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली, घाबरलेल्या डॉ.राहुल (बदलेले नाव) ने पोलिसात जाऊन आरोपी विरुद्ध तक्रार केली. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला आणि डॉ.राहुल (बदलेले नाव) ला खंडणीखोरांना १ कोटी देण्याचे मान्य करण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे रामेश्वर मंदीर परिसरात खंडणी देण्याचे निश्चत झाले. तिथे आरोपी खंडणीची रक्कम घेण्यासाठी पोहोचले आणि साध्या गणवेशात पोलीसही तिथे उपस्थित होते. दरम्यान, डॉक्टर आणि त्यांची पत्नी खंडणीचे पैसे घेवून रामेश्वर मंदीरा जवळ पोहोचले. डॉक्टर दाम्पत्याने त्यांना खंडणीची रक्कम दिली. त्याचवेळी पोलिसांनी या खंडणीखोरांना अटक केली. संपूर्ण प्रकरणाच्या मास्टरमाईंड संदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेत .या प्रकरणी नितिन प्रधान (वय-२०) आणि दत्ता आप्पाराव घुगे (वय-२४) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.