Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली : कवठेमहांकाळमध्ये महिलेचा खून?

सांगली : कवठेमहांकाळमध्ये महिलेचा खून?
 

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ शहरातील जत रोडवर असलेल्या डायमंड बिअर बार समोरील रस्त्यालगत असलेल्या एका बंद असलेल्या खोलीत वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला असून या खोलीला बाहेरून कुलूप असल्याने हा खून असावा अशी चर्चा शहरामध्ये दिवसभर चालू होती. वृध्द महिलेचे नाव शांताबाई शंकर जाधव (वय ६० वर्षे) असून मृत महिला ही कोकळे गावची होती. असे बोलले जात होते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कवठेमहांकाळ शहरात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तळ ठोकला आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, कवठेमहांकाळ शहरातील धुळगांव रस्त्यालगत असणाऱ्या डायमंड बिअर बार समोर जाणाऱ्या रस्त्यालगत भाड्याच्या खोलीमध्ये शांताबाई जाधव ही वृध्द महिला काही दिवसांपासून राहत होती. गेल्या काही दिवसांपासून महिलेच्या घरातून घाण वास येत असल्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घराची तपासणी केली असता, कुलूप तोडून आत प्रवेश करताच शांताबाई जाधव यांचा मृतदेह आढळला.

मयत शांताबाई जाधव यांचा खून करून संशयितांनी बाहेरून कुलूप लावलेले असावे, अशी चर्चा सुरू होती. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलिस अधिकारी जत सुनील साळुंखे, कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे, अभिजीत कासार यांनी भेट देऊन परिस्थितीचा मागोवा घेतला.
 
पोलिसांनी अधिक तपास केला असता वृध्द महिलेचा गळा आवळून खून झाल्याचे प्रथमदर्शी दिसून येत असून, वृध्द महिलेचा नेमका कुणी खून केला व कोणत्या कारणाने खून केला हे अजून उघड झाले नाही. या खुनाच्या घटनेचा कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत चालू होते. वृध्द महीलेच्या खुनाच्या घटनेने कवठेमहांकाळ तालुक्यासह शहरात खळबळ माजली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.