Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

माजी मुख्यमंत्र्याचा मुलगा जिवंत असूनही मृत घोषित

माजी मुख्यमंत्र्याचा मुलगा जिवंत असूनही मृत घोषित
 

कराची : माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र जिवंत असतानाही मृत घषित करण्यात आल्याचा प्रकार पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात घडला आहे. सिंध आरोग्य विभागाने मृत म्हणून घोषित केलेली व्यक्ती प्रत्यक्ष्यातजिवंत असल्याचे निष्पन्न झाले आहे. डॉ. सइद लियाकत अली शाह असे मृत घोषित करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून ते पंजाब प्रांताचे माजी मुख्यमंत्री सईद कईम अली शाह यांचे पुत्र आहेत. ते जिवंत आहेत आणि सरकारी नेत्र रुग्णालयामध्ये कार्यरत आहेत. तरी त्यांना आरोग्य विभागाने मृत घोषित केले होते.

सरकारी नोकरीतील भरती प्रक्रियेच्या एका प्रकरणासंदर्भात न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान हा प्रकार घडला. भरती आदेश जारी करणारे डॉ. लियाकत अली शाह यांचे निधन झाले आहे, असे आरोग्य सचिव, आरोग्य महासंचालक आणि अतिरिक्त आरोग्य सचिवांनी सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी मृत्यूचे प्रमाणपत्र देखील न्यायालयात सादर करण्यात आले.

डॉ. लियाकत अली शाह गेल्या दोन वर्षांपासून नेत्र रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम करत आहेत. याआधी, निवृत्तीनंतर त्यांनी एका वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी प्राध्यापक म्हणून काम केले.[. लियाकत हे पुर्वी जिल्हा आरोग्य अधिकारी होते आणि आरोग्य विभागातल्या ४०० कर्मचाऱ्यांची नियुक्तीची जबाबदारी त्यांच्यावर होती. आपल्याच निधनाचे वृत्त ऐकल्यावर त्यांनी यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. आरोग्य सचिवांकडून आपल्याला काहीही अधिकृत पत्र मिळाले नाही. अधिकृत पत्रावरच आपण प्रतिक्रिया देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.