Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संपूर्ण जग चालत फिरायचे तर किती दिवस लागतील?

संपूर्ण जग चालत फिरायचे तर किती दिवस लागतील?
 

बीजिंग : संपूर्ण जग फिरावे, किमान काही खंडातील ठरावीक बड्या देशांना, पर्यटन स्थळांना एकदा तरी भेट द्यावी, असे जवळपास प्रत्येकाला वाटते आणि त्यात काही गैरही नाही. आता फिरायचं म्हणजे त्यासाठी गडगंज पैसे हवेत. ते प्रत्येकाकडे असतीलच, असेही नाही. कित्येक लोक असे आहेत ज्यांना जग फिरायची इच्छा आहेत, पण तितके पैसे नाहीत म्हणून त्यांचं हे स्वप्न स्वप्नचं राहते. अशा परिस्थितीत एकच मार्ग शिल्लक राहतो, तो म्हणजे जगभर अकरा नंबरच्या बसने पदभ-मंती! आता जगभर पायी चालायचं असे म्हटले तर मात्र एकच प्रश्न डोळ्यासमोर उभा ठाकेल, तो म्हणजे जगभर पायीभ-मंतीसाठी कालावधी तरी किती लागेल?

एका कमर्शिअल फ्लाइटने जग फिरायचे झाले तर जवळपास 7 दिवस लागतील. पण, अशा पद्धतीने फक्त त्या देशात पाय ठेवता येईल. संपूर्ण देश नीट फिरता येत नाही. जगातील फक्त महत्त्वाची शहरे फिरायची झाली तर प्रायव्हेट जेटने 3 दिवस लागतील. कारने संपूर्ण जग फिरायचे तर 3-6 महिने लागतील. तरी समुद्रापलीकडे असलेले देश तुम्ही कारने फिरू शकत नाहीत. बोटीतून जायचे म्हणजे बोट हवी आणि बोटीने जग फिरायचं झालं तर 3 ते 5 वर्षे लागतील. या प्रवासाचा कालावधीसुद्धा मार्ग, स्टॉप्स आणि हवामानावरही अवलंबून आहे.आता पायी जग फिरायचे झाले तर यासाठी 10 ते 20 वर्षे लागतील. टॉम टुर्किक नावाची एक व्यक्ती पायी जग फिरली आहे, तो 7 वर्षांत संपूर्ण जग फिरला. त्याने यावर पुस्तकही लिहिले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.