यवतमाळ : यवतमाळच्या पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांचा हलगर्जीपणा व चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याने एका गर्भवतीचा प्रसूतीदरम्यान रक्तस्राव होऊन मृत्यू झाला. या प्रकरणी महिला वैद्यकीय अधीक्षकावर पुसद शहर पोलिसांनी तब्बल एक वर्षानंतर गुन्हा नोंदविला.
वैद्यकीय समितीच्या अहवालानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यवतमाळच्या पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. मीनल भेलोंडे पवार असे गुन्हा नोंद झालेल्या महिला वैद्यकीय अधीक्षकांचे नाव आहे. दरम्यान १९ मार्च २०२४ रोजी मृत्यूची घटना घडली होती. भाग्यश्री प्रदीप धाईस्कर या महिलेला १८ मार्च २०२४ रोजी उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी आणले होते. त्यावेळी तेथील नर्सने सिझरसाठी यवतमाळ येथे खासगी दवाखान्यात नेण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार सदर महिलेचा पती प्रदीप शिवाजी धाईस्कर पत्नीला यवतमाळ येथे घेऊन जाण्यासाठी तयार होता.
अति रक्तस्त्राव होऊन महिलेचा मृत्यू
मात्र डॉ. मीनल भेलोंडे (पवार) या तिथे आल्या. यावेळी त्यांनी माझ्या खासगी दवाखान्यात सिझर केले, तर तुम्हाला ५० हजार रुपये खर्च लागेल. सरकारीत सिझर केल्यास २० हजार रुपये लागेल असे त्यांनी सांगितले. त्यानंतर डॉ. मीनल पवार यांनी सायंकाळी भाग्यश्रीचे सिझर केले. लगेच ५ ते १० मिनिटांनी भाग्यश्रीला बेडवर आणून टाकले. मात्र, एक तासाने भाग्यश्रीला रक्तस्राव सुरू झाला. मात्र डॉक्टर व नर्स याना सांगूनही त्यांनी दुर्लक्ष केले.
एक वर्षानंतर डॉक्टरवर गुन्हा दाखल
दरम्यान डॉ. मीनल भेलोंडे या रात्री ११ वाजता आल्या. मात्र त्यांनी कोणताही उपचार न करता खासगी रुग्णालयात भरती करण्याचा सल्ला दिला. खासगी रुग्णालयात ६० ते ६५ हजार रुपयांचा खर्च आला. तेथूनही महिलेला यवतमाळ येथे रेफर करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. दरम्यान भाग्यश्री मृत्यू झाला. त्यानुसार प्रदीप धाईस्कर यांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार चौकशी करत २० मार्च २०२५ रोजी एक वर्षानंतर वैद्यकीय समितीच्या अहवालावरून गुन्हा दाखल झाला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.