Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोल्हापूर : अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाचा लैंगिक अत्याचार

कोल्हापूर : अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाचा लैंगिक अत्याचार
 
 
यड्राव : शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सातवीत शिकणार्‍या अल्पवयीन मुलीवर घरी ये-जा असणार्‍या शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात 'पोक्सो'अंतर्गत गुन्हा दाखल झाला. संशयित विजय भागवत कुंडलकर (वय 36, मूळ रा. कोकलमोहा, ता. शिरूर कासार, जि. बीड, सध्या रा. म्हाडा कॉलनी, शहापूर) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरोधात पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली. शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणार्‍या या घटनेमुळे परिसरातून संताप व्यक्त होत आहे.


संशयित शिक्षक एका संस्थेत काम करतो. पीडित मुलीच्या कुटुंबीयांची व संशयित शिक्षकाची काही वर्षांपासून ओळख आहे. त्याचे घरी येणे-जाणे होते. पीडित मुलगी त्याला मामा म्हणायची. 16 मार्च रोजी सकाळी 9 ते 10 च्या सुमारास घरी कोणीही नसल्याचे पाहून संशयित शिक्षक पीडित मुलीच्या घरी आला. त्याने पीडित मुलीला जवळ बोलावून तिच्याशी अश्लील चाळे केले. बलात्काराचा प्रयत्न केला. पीडितेला धमकी देत, तुझ्या आईला काही सांगू नको, नाही तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही दिली. घडलेला प्रकार समजल्यानंतर आईला मोठा धक्का बसला. तिने तातडीने शहापूर पोलिस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली. पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक किशोरी साबळे यांनी महिला दक्षता समितीच्या सदस्य यांच्यासमोर पीडित मुलीचा इन कॅमेरा जबाब नोंदवला. नराधमाविरोधात बाललैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. या घृणास्पद कृत्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.