ते हरामखोर होते; त्यांनी आई-बहिणींवर अत्याचार केलाय, बाबा रामदेव यांचे मुस्लीम समाजाविषयी वादग्रस्त विधान
रविवारी मिहान येथे होणाऱ्या पतंजली फूड अँड हर्बल पार्कच्या भव्य उद्घाटन समारंभाच्या आधी योगगुरू बाबा रामदेव शनिवारी नागपुरात दाखल झाले. महाराष्ट्रातील औरंगजेबाच्या थडग्याभोवती सुरू असलेल्या वादावर त्यांनी माध्यमांशी बोलताना आपले मत मांडले.
यात त्यांनी मुस्लीम धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे आता नवा वाद होण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावर बोलताना बाबा रामदेव म्हणाले, "भारत ही भगवान राम, भगवान कृष्ण, भगवान शिव आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. आपण आपल्या पूर्वजांच्या वैभवातून प्रेरणा घेतली पाहिजे आणि विकसित भारताच्या उभारणीत योगदान दिले पाहिजे. औरंगजेब हा क्रूर शासक होता आणि त्याच्याबद्दल चर्चा करून काही अर्थ नाही. जुलमी शासक आणि आक्रमकांचे अवशेष जपण्यात काही अर्थ नाही.
आपण आपल्या महान पूर्वजांच्या वारशावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि भारतासाठी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम केले पाहिजे. आपल्या आई बहिणीवर अत्याचार करणारे अकबर औरंगजेब केव्हा ग्रेट झाले?,असा प्रश्न उपस्थित करत आपल्याला चुकीचा इतिहास शिकवला जात असल्याचं बाबा रामदेव म्हणाले आहेत.ते म्हणाले की, आपल्या मुलांना खरा इतिहास शिकवलं जातं नाही. जे शिकवलं जातं आहे त्यात ग्रेट ब्रिटन, ग्रेट अकबर असा इतिहास शिकवला जात आहे. लुटेरा औरंगजेब केव्हा ग्रेट झाला? जेवढे मुसलमान होते ते हरामखोर होते. आपल्या आई आणि बहिणींना हरममध्ये ठेवत होते. बाबरपासून बहादूरशाह जफरपर्यंत मुघलांनी आपल्या आई बहिणीवर अत्याचार केला.मुघल महान आहे की? छत्रपती शिवाजी महाराज महान आहे असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आता ज्यांना जी हेडलाईन बनवायची आहे ते बनवून घ्या, असंही रामदेव बाबांनी सांगितले आहे. महाराष्ट्रात औरंगजेबाच्या वारशावर राजकीय आणि सामाजिक वादविवाद सुरू असतानाच हे वक्तव्य आले आहे. त्यामुळे आता नवा वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.