अमरावती : नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकासह त्याच्या खासगी साथीदाराविरुद्ध पाच हजाराची लाच मागितल्याप्रकरणी अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. पीएसआय दर्शन दिकोंडवार (वय ३८) व खासगी व्यक्ती सुकेश अनिल सारडा (२९,
नांदगावखंडेश्वर) अशी त्यांची नावे असून त्यांच्याविरुद्ध नांदगाव खंडेश्वर
पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. पोलिस उपनिरीक्षक दर्शन दिकोंडवार
यांनी तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे असलेली ट्रॅक्टर ट्रॉली सोडण्यासाठी
पाच हजार रुपयांची लाच मागितली. ती रक्कम मुकेश याच्याजवळ देण्यास
सांगितले, अशी तक्रार एसीबीकडे नोंदविली होती.
१३ मार्चला एसीबीने पोलिस ठाण्यातच ट्रॅप लावला. दिकोंडवार यांना संशय आल्याने त्याने ती लाचेची रक्कम स्वीकारली नाही. मात्र आधी लाचेची रक्कम स्वीकारण्याची दर्शविल्याचे कारवाईदरम्यान तयारी सापळा निष्पन्न झाल्याने १८ मार्चला दिकोंडवार व सुकेश सारडा यांच्याविरुद्ध एसीबीकडून तक्रार दाखल करण्यात आली. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्र, अमरावती मारुती जगताप, अपर पो-लीस अधीक्षक सचिंद्र शिंदे, पोलीस उपअधिक्षक अभय आष्टेकर, पोलीस उपअधिक्षक मंगेश मोहोड यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक चित्रा मेसरे, केतन माजरे, हवालदार प्रमोद रायपुरे, पोलीस अंमलदार शैलेश कडु, अंमलदार वैभव जायले, चालक फौजदार सतिश कीटूकले यांनी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.