Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

इलॉन मस्कने मोदी सरकारला खेचलं कोर्टात; मोठं कारण आलं समोर...

इलॉन मस्कने मोदी सरकारला खेचलं कोर्टात; मोठं कारण आलं समोर...
 
 
अमेरिकेतील उद्योगपती इलॉन मस्कची कंपनी असलेल्या एक्स कॉर्पने मोदी सरकारला कोर्टात खेचलं आहे. या कंपनीने कर्नाटक हायकोर्टात सरकारविरोधात याचिका दाखल केली आहे. सरकारने तयार केलेल्या नियमांवर कंपनीने बोट ठेवत त्यावर गंभीर आक्षेप घेतले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा एक्स आणि केंद्र सरकार आमनेसामने आले आहे. केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान कायद्यातील कलम 79(3)(B) वर प्रश्न उपस्थित केले आहेत. हा नियम बेकायदेशीर सेन्सॉरशिप बनवत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

या कलमानुसार, सरकारला इंटरनेटवरील माहिती ब्लॉक करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यावर कंपनीने आक्षेप घेतला आहे. कंपनीने याचिकेत म्हटले आहे की, पोस्ट हटवण्यासाठी लेखी स्वरुपात कंपनीला कारण देणे आवश्यक आहे. निर्णय घेण्याआधी सुनावणी घेणे आवश्यक असते. त्याला कायदेशीररीत्या आव्हान देण्याचा अधिकारही असायला हवा. या नियमांचे सरकारकडून पालन केले जात नसल्याचा गंभीर आरोप कंपनीने केला आहे.

सरकारकडून संबंधित कलमाची चुकीची व्याख्या केली जात आहे. काही नियमांचे उल्लंघन करणारे आदेश दिले जात आहेत. कलम 69(A) मधील तरतुदींचे पालन केले जात नाही, असेही कंपनीने म्हटले आहे. हा दावा करताना कंपनीने सुप्रीम कोर्टाच्या 2015 मधील श्रेया सिंघल केसचा दाखला दिला आहे. केंद्र सरकारने नुकतेच एक्स कॉर्प कंपनीला त्यांच्या एआय चॅटबॉट ग्रोकवरून प्रश्न उपस्थित केले आहेत.
 
यामधील भाषा आक्षेपार्ह असल्याचे केंद्राने म्हटले होते. कंपनीकडून याबाबतचे उत्तर मागविण्यात आले आहे. यापूर्वी कंपनीला सरकारने एक्सवरील का पोस्ट किंवा माहिती हटवण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, केंद्र सरकारकडून सोशल मीडियातील कंटेटवरून अनेकदा कंपन्यांना ताकीद दिली आहे. कायद्यामध्ये बदलही केले आहेत. त्यामुळे फेसबुकसह एक्सकडून त्यावर आक्षेप घेण्यात आले होते. आता पुन्हा एकदा मस्क यांच्या कंपनीने हायकोर्टात याचिका दाखल करत केंद्र सरकारच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.